नोटा बंदमुळे कांद्यासह धान्याचे भाव घसरले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नाशिक - काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी पाचशे-हजाराच्या नोटा बंद करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे पडसाद बुधवारी बाजार समित्यांमध्ये उमटले. लासलगाव आणि कळवण बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण झाली. तसेच लासलगावमध्ये गहू, हरभरा, सोयाबीनच्या भावात घसरण झाली आहे. नाशिकमध्ये आवक कमी होऊनही कोथिंबीर आणि मेथीला सरासरी भाव कमी मिळाला आहे. अशातच, आता गुरुवार (ता. 10) ते सोमवारपर्यंत (ता. 14) बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. 

चलनाची सुविधा उपलब्ध नसल्याने क्षमतेपेक्षा अधिक व्यापार झाला आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्यास काय करायचे, अशी धाकधूक बाजार समित्यांच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये होती. त्यातच, कांदा व्यापारी संघटनेने उद्या लिलाव करणार नसल्याचे पत्र बाजार समित्यांना दिले आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या जोडीलाच धान्याची खरेदी न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. लासलगावमध्ये मंगळवारी (ता. 8) क्विंटलभर उन्हाळ कांद्याला एक हजार एक रुपये भाव मिळाला होता. आज 982 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विक्री करावी लागली. याशिवाय काल इथे क्विंलटभर गहू दोन हजार 301 रुपयांना, तर आज दोन हजार 152 रुपयांना, हरभरा काल 9 हजार 1 रुपयांना आणि आज 8 हजार 300 रुपयांना, तर सोयाबीन काल 2 हजार 766 व आज 2 हजार 660 रुपयांना विकले गेले. नाशिकमध्ये कालच्या तुलनेत आज शंभर जुडीच्या कोथिंबिरीच्या भावात सहाशे, तर मेथीच्या भावात चारशे रुपयांची घट झाली. 

शेतकऱ्यांनी स्वीकारल्या नोटा अन्‌ धनादेश 

पाचशे-हजाराच्या नोटा बंद झाल्या असल्या, तरीही आज जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी विकलेला कांदा, भाजीपाल्यासह धान्याच्या बिलापोटी या नोटा स्वीकारल्या. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी मालाच्या किमतीचे धनादेश व्यापाऱ्यांकडून घेत असतानाच काहींनी बॅंकिंग व्यवहार सुरळीत झाल्यावर पैसे घेण्याची तयारी दर्शवली आहे.

Web Title: Food prices dropped off notes