विदेशी पर्यटकही बॅंकेच्या रांगेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

वाकोद (ता. जामनेर) - नोटाबंदीमुळे स्थानिक नागरिकांसह जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत येणाऱ्या विदेशी पर्यटकांचेही हाल होत आहेत. नवीन चलन मिळवण्यासाठी या पर्यटकांनाही बॅंकेच्या रांगेत उभे राहण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या फर्दापूर (ता. सोयगाव) येथे बघावयास मिळत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय योग्यच असून, पुढील दोन वर्षांत मोदी यांच्या नेतृत्वात भारत खूप प्रगती करेल, अशा सकारात्मक प्रतिक्रिया या पर्यटकांनी व्यक्त केली आहे. 

कॅन्डी (श्रीलंका) येथून भदंत रेव कालुगमवे सोबितो थेरो हे श्रीलंका येथून बावन्न पर्यटकांना घेऊन अजिंठा लेणी बघण्यासाठी फर्दापूर येथे आले. मात्र, हजार व पाचशे रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द झाल्याचे कळल्यानंतर या पर्यटकांची तारांबळ उडाली. 

दरम्यान, सोमवारी बॅंकेला सुटी असल्याने आज मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच स्थानिक नागरिकांनी फर्दापूर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रामध्ये प्रचंड गर्दी केली होती. त्यातच श्रीलंकेचे पर्यटकही चलन बदलून घेण्यासाठी आल्याने गोंधळ उडाला. हे पर्यटक सुमारे तासभर बॅंकेसमोरील रांगेत थांबले. बॅंकेचे व्यवस्थापक मित्रा यांनी त्यांची भेट घेऊन आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून या पर्यटकांना प्रत्येकी चार हजार रुपयाप्रमाणे चलन बॅंकेने बदलून दिले. 

श्रीलंकेचे सहल प्रमुख भदंत रेव कालुगमवे सोबितो थेरो यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा खूप चांगला निर्णय घेतला आहे, चलनाच्या तुटीमुळे थोडे दिवस लोकांना त्रास होईल. मात्र, मोदींच्या नेतृत्वात पुढील दोन वर्षांत भारत खूप प्रगती करेल. मोदी हे जगातील सर्वोत्तम पंतप्रधानांपैकी एक आहेत, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: foreign tourists in the bank queue