चिंकारा हरणाची शिकारप्रकरणी फरार आरोपीच्या शोध लावण्यास वनविभाग अपयशी 

चिंकारा हरणाची शिकारप्रकरणी फरार आरोपीच्या शोध लावण्यास वनविभाग अपयशी 

अंबासन - (जि.नाशिक) मळगाव भामेर (ता.बागलाण) येथील पोहाणे शिवारातील चिंकारा (काळवीट) शिकारप्रकरणी फरार झालेल्या आरोपींचा शोध लावण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याने वनविभागाकडून गुजरातमध्ये स्थानिक वनविभाग, जिल्हा परिषद व पोलिसांकडून मदत घेतल्याने लवकरच फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असे ताहाराबाद वनपरिक्षेत्र आधिकारी निलेश कांबळे यांनी 'सकाळ'शी बोलतांना सांगितले. 

काटवन व अंबासन परिसरातील वनविभागाच्या राखीव क्षेत्रात अनेक जातीचे वन्यजीव वावरत असतात. यात चिंकारा जातीचे हरणे व मोर यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रविवारी (ता.१८) रोजी जिभाऊ तुळशीराम आहिरे (रा.अंबासन) यांच्या दारूच्या अड्डयावर अकरा शिका-यांनी वन्यजीव सायाळची शिकार करून ताव मारला व मध्यरात्रीच्या सुमारास पोहणे शिवारात दोन पाळीव कुत्र्यांना घेऊन काळवीटाची शिकार केली होती. ग्रामस्थांच्या मदतीने वनकर्मचा-यांनी शिताफीने पाठलाग करून जिभाऊ आहिरे, रा.अंबासन, शैलेश सोन्या बागुल व तुळशीराम सखाराम पवार दोघे (रा.कंरजटी, ता.अहवा) गुजरात राज्य या तीन जणांना ताब्यात घेतले होते तर आठ शिकारी अंधाराचा फायदा घेवून फरार झाले. तिघांना न्यायालयाने चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून अन्य आठ आरोपींचा वनविभागाकडून कसून शोध घेतला जात आहे. हिरामण जिभाऊ आहिरे, रा.अंबासन (ता.बागलाण) या फरार आरोपीचा सर्वत्र शोध घेतला जात असून वनविभाग व पोलिस त्याच्या मागावर असल्याचे आधिका-यांनी सांगितले. तसेच अन्य आरोपी परवीश मंगा चौधरी, सुरेश मुरली वारळी, पिंट्या मगन वारळी, धर्मेश आडगू, शिवमन उमेश वारळी, ईश्वर गंगाराम गावित, आश्विन गंगाराम गावित (सर्व राहणार कंरजटी ता.अहवा) हे गुजरात राज्यातील असल्याने वरिष्ठ अधिका-यांच्या पथकाने गुजरात पोलिस, वनविभाग व जिल्हा परिषदेची मदत घेतली आहे. वनविभाग आरोपींना शोधण्यात अजूनही यश मिळात नसल्याने वरीष्ठ आधिका-यांनी शोधण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहेत. या आरोपींचा लवकरच छडा लावण्यात वनविभागाला यश मिळेल व संबंधित आरोपींवर कठोर कार्यवाही होईल असे ताहाराबाद वनपरिक्षेत्र आधिकारी श्री. कांबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com