कंधाणे येथील भागडा डोंगरास आग 

रोशन भामरे 
सोमवार, 19 मार्च 2018

जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांतून आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

तळवाडे दिगर (जि. नाशिक) - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील कंधाणे येथील भागडा डोंगरास आज दुपारी एक वाजेच्या सुमार मोठ्या प्रमाणत आग लागली त्या आगीत बऱ्याच प्रमाणात डोंगराचा भाग आगीचा भक्षक बनला. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेणे व पर्यावरण प्रेमामुळे तब्बल अडीच ते तीन तास शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्यात यश आले.
 
जैवविविधतेने नटलेल्या आणि अनेक प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान असलेल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील डोंगरदऱ्यांतून आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेक जीव-जंतू आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नष्ट होऊ लागले आहेत. तर शेकडो एकर गवत जाळून खाक केले जात आहे. उन्हाळा सुरु झाला आणि पावसाळा जवळ आला कि या परिसरात असे वणवे दरवर्षी पेटू लागतात पूर्वीचे गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात येणारे गवत हे चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत मासे आगी लावण्याचे काम करतात. एकदा आग लगली कि शेकडो हेक्टर परिसरात ती पसरते. अनेकदा ही आग संपूर्ण जंगलातील डोंगरदऱ्यांत मार्गक्रमण करते. त्यामुळे वन कर्मचारी, अधिकाऱ्यांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

कंधाणे येथील भागडा डोंगर हा वनविभागाच्या प्रयत्नाने आणि सामाजिक वनीकरणाच्या योजनेतून गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वी हजारो वृक्षांची लागवड करून ते जंगल राखले होते त्यामुळे तेथे मोठ्याप्रमानात झाडा झुडपांनी बहरलेला असंस्ख्य वन्य-प्राणी पक्षांचे आश्रयस्थान असणाऱ्या डोंगरावर भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असलेल्या गावकऱ्यांना अभिमान वाटणाऱ्या डोंगराला दुपारी अचानक आग लागल्यामुळे गावातील गावकऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली तसेच गावातील तरुण व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अडीच ते तीन तासाच्या शर्तीचे प्रयत्न करून आग विजवून भागडा डोंगरवरी मोठ्या प्रमाणत असलेल्या मोराचे तसेच असंख्य प्राणी, पक्षी व जीव-जंतूंचे प्राण वाचवले.

त्यावेळी वनपाल जे.के.शिरसाठ,संजय बोरसे,वनरक्षक किशोर मोहिते, एन. एम मोरे, पठाण कंधाणे येथील उपसरपंच रवींद्र बिरारी, योगेश बिरारी, महेश बिरारी, योगेश देवरे, काळू गायकवाड, दीपक बिरारी यांच्यासह गावातील आदी तरुण उपस्थित होते. त्यांच्या या झुंझार कामगिरीमुळे वसंत दोधुजी बिरारी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एम. बिरारी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

“सध्या बागलाण तालुक्यात बऱ्याच प्रमाणात डोंगरांना आगी लावल्या जात आहेत. पूर्वीचे गवत जाळल्यामुळे पावसाळ्यात येणारे गवत हे चांगले येते. या समजुतीने असे प्रकार सर्रास घडतात. काही विकृत मासे आगी लावण्याचे काम करतात. मात्र तसे काहीही नसते हि प्रवृत्ती बदलण्यासाठी वनविभागाने जनजागृती करणे गरजेचे आहे” असे कंधाण्याचे उपसरपंच रविंद्र बिरारी यांनी सांगितले. 

Web Title: forest kandhana nasik fire