जिल्हा परिषदेच्या 16 गटांमधून 26 ऑनलाइन अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पाच पंचायत समित्यांसाठीच्या 11 अर्जांचाही समावेश
नाशिक - जिल्हा परिषदेच्या 73 आणि 15 पंचायत समित्यांच्या 146 गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरवात झाली. पहिल्या दिवशी 16 गटांमधून 26, तर पाच पंचायत समित्यांसाठी 11 ऑनलाइन अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एकही अर्ज जमा करण्यात आला नाही.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत राजकीय पक्षांचा "एबी' फॉर्म जमा केल्यावर अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाचे चिन्ह दिले जाणार आहे. तसेच पहिल्यांदा "एबी' फॉर्म जमा करणारा उमेदवार राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष या प्रमुख राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता उमेदवारी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. पहिल्या दिवशी नांदगाव, निफाड, नाशिक, इगतपुरी आणि सिन्नर तालुक्‍यांतील गट, गणातून एकही उमेदवारी ऑनलाइन पद्धतीने दाखल झालेली नाही.

गट-गणांमधील अर्ज
तालुकानिहाय गट आणि गणांसाठी ऑनलाइन पद्धतीने दाखल झालेल्या अर्जांची संख्या अशी ः बागलाण- 4-0, मालेगाव- 1-2, देवळा- 8-0, कळवण- 0-2, सुरगाणा- 4-0, पेठ- 3-0, दिंडोरी- 1-1, चांदवड- 5-0, येवला- 0-2, त्र्यंबकेश्‍वर- 0-4.

Web Title: form submission for zilla parishad