शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थ्याकडून शाळेला देणगी

Former student donates to school on the Occasion of teachers day
Former student donates to school on the Occasion of teachers day

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील रहिवासी, ग्रामपंचायत सदस्य व निजामपूर-जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जाकीर लतीफ तांबोळी यांनी शाळेला एकवीस हजाराची देणगी देत शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा अनोखा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे संपूर्ण माळमाथा परिसरात कौतुक होत आहे.

जाकीर तांबोळी हे शाळेचे सन 1992 व 1994 या शैक्षणिक वर्षांचे अनुक्रमे दहावी-बारावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. संस्थेचे ज्येष्ठ संचालक व आदर्श महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. शरदचंद्र शाह यांचा 78वा वाढदिवस नुकताच अनोख्या पद्धतीने साजरा झाला. त्यात त्यांनी सत्कार स्वीकारण्याऐवजी दिवसभरात दहा हजार रुपये विद्यार्थी कल्याण निधी संकलित करुन तो शाळेच्या 'विद्यार्थी विकास मंच'कडे सुपूर्द केला होता.

अॅड. शाह यांच्या वाढदिवसाला त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन आज (ता.4) तांबोळी यांनी संस्थेच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कुलच्या इमारत बांधकामासाठी एकवीस हजाराचा धनादेश ऍड. शरदचंद्र शाह यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे सचिव नितीन शाह, मुख्याध्यापक जयंत भामरे, उपमुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, सुरेश माळी, अफसर सय्यद आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. तांबोळी यांचा शाळेतर्फे ऍड. शाह यांनी विशेष सत्कार केला. संस्था व शाळेतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

''शाळेने मला खूप काही दिले आहे. मी आज जो काही आहे तो केवळ शाळेने दिलेल्या संस्काराचा परिपाक आहे. माझ्या शाळेसह संस्थाचालकांच्या व गुरुजनांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा अल्पसा प्रयत्न असून भविष्यातही वेळोवेळी मी शाळेला सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध राहील.!"
- जाकीर लतीफ तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य व माजी विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com