'इतके' बेशिस्त वाहनचालक वाहतूक शाखेच्या तावडीत..

traffic mohim 2.jpg
traffic mohim 2.jpg

नाशिक : रस्ता अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शहर वाहतूक शाखेने गुरुवार (ता. १४) पासून विशेष मोहीम राबवत सुमारे चारशे बेशिस्त वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. या बेशिस्तांकडून पोलिसांनी एक लाख दोन हजार 200 रुपयांचा दंड वसुल केला आहे. वाहतूक शाखेकडून ही कारवाई शुक्रवारी (ता. 15)ही सुरूच असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे. 

लाखभर दंडाची वसुली; हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करण्यासह जनजागृतीवर भर 

पोलिस आयुक्तालय हद्दीत गेल्या दहा महिन्यांमध्ये रस्ता अपघातांमध्ये 139 जण मृत्युमुखी पडले आहेत. यात 67 दुचाकीस्वार हे हेल्मेट न वापरल्याने, तर दहा चारचाकीचालक हे सीटबेल्ट न वापरल्याने बळी गेले आहेत. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने गुरुवारपासून बेशिस्त वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबविली. त्यानुसार शहरातील 13 पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी करीत सकाळी आणि सायंकाळी विनाहेल्मेट, विनासीटबेल्टसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. यात आज पहिल्याच दिवशी वाहतूक शाखेने 413 बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत एक लाख दोन हजार 200 रुपयांचा दंड वसुल केला. त्यामध्ये 128 विनाहेल्मेट दुचाकीस्वार, तर 37 सीटबेल्टचा वापर न करणारे चारचाकीचालकांचा समावेश आहे. 
 
102 रिक्षाचालकांवर कारवाई 
वाहतूक शाखेने बेशिस्त रिक्षाचालकांवरही कारवाईचा बडगा उगारला. 102 बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करीत, काही रिक्षाचालकांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. दरम्यान, वाहतूक शाखेकडून रविवार (ता. 17)पर्यंत ही मोहीम सुरू राहील. वाहनचालकांनी हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करावा. वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com