चोंढी घाटात अपघातात चार ठार; चार जखमी

malegaon.
malegaon.

मालेगाव - मालेगाव-मनमाड रस्त्यावरील चोंढी घाटात ट्रक व इर्टिगा कारची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांसह दोन महिलांचा समावेश आहे. प्रयागराज येथून शालकाचा विवाह आटोपून पुणे येथे परतांना सोमवारी पहाटे हा अपघात झाला. या अपघातात दीड वर्षीय वंश विजीतसिंग परमार हा मुलगा सुखरुप बचावला.

पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस असलेले मृत्युंजयसिंग नरेंद्रबहादुरसिंग (३६, रा.कोसंबी, उत्तरप्रदेश, हल्ली पुणे) त्यांचा साडू विजितसिंग परमार (३४, रा. ईतवारा, नांदेड) या दोघांचे कुटुंबिय प्रयागराज येथे शालकाच्या विवाहसोहळ्यासाठी गेले होते. २१ फेब्रुवारीचा विवाह आटोपून पुण्याकडे जात असतांना इर्टिगा कार (एमएच ११ बीएच ६७४६) व ट्रकची (एमएच ११ एए १३७७) समोरासमोर धडक झाली. यात इर्टिगाचा पुढील भाग पुर्णत: चेपला गेला. अपघातात अंजुसिंग विजितसिंग परमार (२८, रा. ईतवारा, नांदेड), त्यांचा मुलगा विरेंद्र परमार (वय ७), बहिण शालिनीसिंग मृत्युंजयसिंग (३०, रा. कोसंबी, उत्तरप्रदेश, हल्ली पुणे) व मुलगी रिध्दीसिंग मृत्युंजयसिंग (६) हे चौघे जागीच ठार झाले.

या अपघातात विजीतसिंग परमार (३४), त्यांचा मुलगा वंश (वय दीड वर्ष), मृत्युंजयसिंग (३६, रा.कोसंबी, उत्तरप्रदेश, हल्ली पुणे), त्यांची मुलगी रितसिंग (५) हे चौघे जखमी झाले. चौघा जखमींवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाताचे वृत्त समजताच तालुका पोलिस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक निरीक्षक विशाल टकले, उपनिरीक्षक जयसिंग राजपूत, हवालदार आर. आर. अहिरे, रुग्णवाहिका चालक गणेश शेवाळे आदी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गणेश व परिसरातील नागरिकांच्या मदतीने गाडीतून मृतदेह बाहेर काढले. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांचे नातेवाईक येत नसल्याने दुपारपर्यंत मृतांची ओळख पटली नव्हती. दुपारी पाऊणेदोनच्या सुमारास मृत्युंजयसिंग यांचा भाऊ गिरीश पुण्याहून येथे दाखल झाला. यानंतर मृतांची ओळख पटली. तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com