पुण्यातील चौघांना हत्यारांसह अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

मुथुट फायनान्सवरील दरोड्यानंतर शहरात पोलिसांकडून सुरू असलेल्या छापेमारीत सीबीएस परिसरात हॉटेलमधून हत्यारांसह पुण्याच्या चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक - मुथुट फायनान्सवरील दरोड्यानंतर शहरात पोलिसांकडून सुरू असलेल्या छापेमारीत सीबीएस परिसरात हॉटेलमधून हत्यारांसह पुण्याच्या चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील उमाकांत तावरे (वय 22, रा. शास्त्रीनगर, पुणे), शुभम संदीप उत्तेकर (वय 18, रा. एअरपोर्ट रोड, पुणे), अक्षय गणेश लोले (वय 22, रा. शिवाजीनगर, पुणे), दत्ता नारायण गिरे (25, रा. टिंगरेनगर, श्रमिकनगर, पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशान्वये गेल्या शनिवारी (ता.15) रात्री कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले होते. यात शहरातील लॉज, हॉटेल्सवर छापामारी करीत पोलिसांनी तपासणी केली. त्यानुसार, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, सरकारवाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांच्यासह पथकाने सीबीएस चौकातील पद्‌मा हॉटेलमध्ये तपासणी केली. त्या वेळी रूम नंबर 209 मध्ये असलेल्या चारही संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांनी पुण्याचे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये कुकरी, मोठा चाकू अशी हत्यारे मिळाली. पोलिसांनी चौघांना अटक केली असून सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four People Arrested with weapon Crime