Dhule Crime News : ट्रकचालकासह चौघांना बेदम मारहाण; साक्रीत 10 जणांविरुद्ध गुन्हा | Four people including truck driver were brutally beaten dhule crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beating

Dhule Crime News : ट्रकचालकासह चौघांना बेदम मारहाण; साक्रीत 10 जणांविरुद्ध गुन्हा

Dhule Crime : गंगापूर (ता. साक्री) शिवारातील टोलनाक्यापासून अर्धा किमीवर ट्रक चालकासह चौघांना बेदम मारहाण करण्यात आली. (Four people including truck driver were brutally beaten dhule crime news)

ट्रकच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले. मारहाणीत चौघे जखमी झाले असून याप्रकरणी संशयित आठ ते दहा जणांविरोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

काझीखान काबलखान पठाण (वय २५, रा. रावडीचेक, जैलसमेर, राजस्थान) हा त्याच्या ताब्यातील ट्रकमधील (आरजे २१ जीडी ७११२) युरिया संपल्याने तो भरण्यासाठी नवकार टाटा मोटर्स शोरूमला वाहन उभे केले. तेथील कामगाराने युरिया भरण्यासाठी टाकीत नोझल टाकले.

नंतर ते नोझल जोरजोरात हलवित होता. त्यास काझीखान याने विचारणा केली असता संबंधित कामगाराने मला शिकवू नको, असे म्हणत काझीखानची कॉलर पकडून धक्का दिला. नंतर काझीखान हा युरिया भरून झाल्यावर पैसे देऊन निघून गेला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शोरूम येथे तीन ते चार जणांनी दुसऱ्या ट्रकवरील क्लीनर अहमद खान आणि अत्ता मोहम्मद यांना मारहाण केली. याबाबत अहमदन खान याने काझीखान यास फोन करून कळवीत तू गाडी वळवून निघून जा, असे सांगितले.

मग गंगापूरजवळील टोल नाक्याजवळ आठ ते दहा जणांनी दुचाकीवर येत काझीखानचा ट्रक थांबवून त्याच्यासह क्लीनर बादलखान यास काठीने व हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. काचा फोडून नुकसान केले. मारहाणीत चौघे जखमी झाले.

टॅग्स :Dhulecrime