जळगाव: एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

मृतांमध्ये प्रदिप सुरेश भोळे (वय 47) त्यांची पत्नी संगिता प्रदिप भोळे (वय 32) मुलगी दिव्या प्रदिप भोळे (वय 7) आणि मुलगा चेतन प्रदिप भोळे (वय 5) यांचा समावेश आहे. 

जळगाव - तालुक्यातील भादली गावातील भोळे वाड्यात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये प्रदिप सुरेश भोळे (वय 47) त्यांची पत्नी संगिता प्रदिप भोळे (वय 32) मुलगी दिव्या प्रदिप भोळे (वय 7) आणि मुलगा चेतन प्रदिप भोळे (वय 5) यांचा समावेश आहे. 

या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, तपास करत आहेत.

Web Title: four from the same family killed in Jalgaon