चौथ्या वर्गातील शितलचे गाणे सोशल मिडीयावर व्हायरल

खंडू मोरे
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

विविध शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या फांगदर ता. देवळा येथील मराठी शाळेतील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या शितल माळी या वस्तीपासून आपल्या घरापर्यंत तीन किमी पायवाटेने जाणाऱ्या शेतमजुराच्या ग्रामीण भागातील वस्तीशाळेतील मुलीने गायलेल्या गिताने रसिकांना वेड लावलं आहे.

खामखेडा (नाशिक) - ग्रामिण भागातील वाड्यावस्त्यांवरील शाळांमध्ये सुरु असलेल्या शैक्षणिक प्रयोगांमुळे मराठी शाळांची वेगळी ओळख शैक्षणिक वर्तुळात उमटल्याने या शाळांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

विविध शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या फांगदर ता. देवळा येथील मराठी शाळेतील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या शितल माळी या वस्तीपासून आपल्या घरापर्यंत तीन किमी पायवाटेने जाणाऱ्या शेतमजुराच्या ग्रामीण भागातील वस्तीशाळेतील मुलीने गायलेल्या गीताने रसिकांना वेड लावलं आहे.

विद्यार्थीनीने गायलेले “आई तुझे उपकार फिटणार नाहीत” हे गाणे सोशल माध्यमात लोकप्रिय झालं आहे. फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या या गाण्याच्या व्हिडीओवर दहाबारा दिवसात तबल ३३६००५ यूजर्सने पसंतीची मोहोर उमटवली आहे.

खामखेडा ता. देवळा येथील जिल्हा परिषदेच्या फांगदर शाळेची विद्यार्थिनी शितल हरी माळी हिचा आवाज चांगला असल्याने तिचे वर्ग शिक्षक संजय गुंजाळ व खंडू मोरे यांनी तिच्या आवाजात अभ्यासक्रमातील कविता बडबड गीते बसवून घेतलीत. या आधीही तिच्या आवाजातील रानवेडी कविता सोशल माध्यमात अपलोड केली होती. तिचा आवाज चांगला असल्याने तिच्या आवाजाचे शैक्षणिक वर्तुळात खूप कौतुक झाले.

त्यानंतर शिक्षकांनी तिच्या आवाजात विविध गीते गाऊन घेतली. शाळेत येणाऱ्या अधिकारी, शाळा भेटीस येणाऱ्या शिक्षण प्रेमी, शालेय व्यवस्थापन समिती यांच्या समोर तिला शिक्षकानी गायनाची संधी देत गेले. त्यामुळे तिला आत्मविश्वास निर्माण झाला. शेतमजूर असलेल्या आई वडिलांकडून शैक्षणिक गरजा देखील पुर्ण होवू शकणार नसताना फक्त शिक्षकांच्या मदतीने यु ट्युब, संग्रहित असलेल्या गितांवरून शितलने आपल्या आवाजास सूर ताल लय यांचा ठेका धरत आपल्या आवाजाला वेगळा साज चढवला. नुकतेच तिचे वर्ग शिक्षक संजय गुंजाळ यांनी आईचे गीत शितलला देत तिच्याकडून पाठांतर करून घेत तालासुरात बसवून घेतले.

शितलच्या आवाजात गायलेले आई तुझे उपकार फिटणार नाहीत. हे गित शिक्षक खंडू मोरे यांनी चित्रित करत आपल्या फेसबुक पेजला अपलोड केले. अन् या गीतास दहा दिवसात तीन लक्षाहून अधिक व्ह्युज् व काही हजारांच्या घरात लाईक मिळवत व अनेकांनी शेअर करत मराठी शाळेतील आदिवासी मुलीने गायलेले गीत फेसबुक पेज व हॉट्स अॅपवर धुम करीत आहे. 

फांगदर सारख्या ग्रामीण भागातील शाळेतील आदिवासी विद्यार्थिनीने गायलेल्या गितास रसिकांनी डोक्यावर घेतले असुन लाखो लोकांपर्यंत गाणे पोहचले असल्याने या गाण्याने मराठी शाळांची प्रतिमा उंचावली आहे. - संजय गुंजाळ, शिक्षक

फांगदर शाळेची वेगळी ओळख जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात आहे. सोशल माध्यमातून मदत मिळवत त्यांनी शाळेचा विकास घडवून आणला असून या मुलीच्या उत्कृष्ट आवाजातील ह्या गीताच्या माध्यमातून राज्यभरात या शाळेला पोहचण्याची संधी मिळाली आहे. - सुनिता धनगर, गटशिक्षणाधिकारी देवळा

 

Web Title: Fourth standards girl Shital Malis song goes viral on social media