आंधश्रद्धेपोटी एकाची दिड लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नांदगाव - ‘घरातनागमणी ठेवल्यास तुझी भरभराट होईल, पैसाअडका मुबलक राहील, असे सांगून सांगली जिल्ह्यातील एकाची दीड लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नांदगाव तालुक्यातील सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व जण तालुक्यातील अस्वलदच्यातील फासेपारधी आहेत.

नांदगाव - ‘घरातनागमणी ठेवल्यास तुझी भरभराट होईल, पैसाअडका मुबलक राहील, असे सांगून सांगली जिल्ह्यातील एकाची दीड लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नांदगाव तालुक्यातील सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व जण तालुक्यातील अस्वलदच्यातील फासेपारधी आहेत.

सांगली जिल्ह्यातील जततालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर यांचेकुरणे वस्तीवरछोटेखानी हॉटेल आहे. त्यांच्या गावाजवळ अथनीरोडला यल्लमा देवीचे मंदिर आहे. या देवीच्या यात्रेच्या निमित्ताने त्यांची ओळख सातारा येथील राजू डोबे यांच्याशी झाली. मैत्रीतून हे दोघे फिरण्यासाठी मनमाडला आले.राजू यांना एकाने दूरध्वनी करून भेटावयास बोलावले. त्याप्रमाणे ते नांदगावच्या बसस्थानकावर आले. तेथे त्यांना जाडसर काळ्या रंगाची व सफेद दाढी असलेली व्यक्ती भेटली.  ती या दोघांना अस्वलदरा येथील त्याच्या वस्तीवर घेऊन गेली. त्या ठिकाणी या दोघांना एका खोलीत अंधार करून चमकणारा मणी दाखविला. हा नागमणी केवढ्याला विकणार, अशी विचारणा राजूने केली. दाढीवाल्या व्यक्तीने पाच लाख रुपये किंमत सांगितली. राजूने त्याची एक लाख रुपये किंमत सांगितली. त्या किमतीला हा दाढीवाला राजी झाला नाही. राजूबरोबरचा सौदा फिस्कटल्याने हे दोघे पुन्हा आपल्या गावी निघून गेले. मणी विकण्यासाठी हा दाढीवाला धनाजी यांना वारंवार संपर्क करू लागला. धनाजी यांनी अस्वलदरा येथे एक लाख ६३ हजार रुपये रोख दिले. चमकणारा मणी दाखवीत पक्ष्याच्या अंड्यासारख्या डबीत ठेवलेली ही डबी घरी गेल्यावर देवपूजा करून उघड अन्यथा मण्याची शक्ती कमी होईल, असे सांगून हा नागमणी विकला.

घरी गेल्यावर धनाजी यांचा नागमणी प्रकाशित झालाच नाही. त्यामुळे आपण फसविले गेलो हे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी अस्वलदरा येथील दाढीवाल्यासह पाच संशयितांना ताब्यात घेतले. हवालदार रमेश पवार तपास करीत आहेत.

Web Title: fraud on one lack because of superstition