साडेपाच लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

नाशिक - सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजना राबविली जात असते. आगामी शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये जिल्हाभरातील पाच लाख 48 हजार 373 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे संच वाटप केले जाणार आहेत. शासकीय शाळा,  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुली व विविध प्रवर्गातील मुलांना दोन गणवेशांसाठी अनुदान दिले जाणार आहे. दोन लाख 47 हजार 13 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ होणार आहे. अद्याप 74 हजार विद्यार्थ्यांनी बॅंक खाती उघडलेली नसल्याने ती उघडावी लागतील. 

इयत्ता पहिली ते आठवीसाठीच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खासगी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी 15 जूनला पुस्तके वाटप केले जाणार आहेत. टप्याटप्याने पुस्तक संच तालुका स्तरावर पोचविण्याचे काम केले जात आहे. 17 मेपर्यंत जिल्ह्यात 35 टक्‍के पुस्तके पोचविण्यात आल्याची नोंद आहे. 

गणवेशाचे अनुदान  खात्यात होणार जमा 
सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जातीची मुले, अनुसूचित जमातीची मुले, तसेच दारिद्य्ररेषेखालील सर्व संवर्गातील पालकांची मुले यांना दोन मोफत गणवेश पुरविले जाणार आहेत. या दोन गणवेशांसाठी प्रति विद्यार्थी चारशे रुपयांप्रमाणे अनुदान शाळा व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात दिले जाईल. गणवेश खरेदी केल्यानंतर देयक शाळा व्यवस्थापन समितीस सादर केल्यावर रक्‍कम बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. सध्या लाभार्थी विद्यार्थ्यांची बॅंक खाती उघडण्याचे काम सुरू असून, अद्याप 74 हजार विद्यार्थ्यांची बॅंक खाती उघडलेली नाहीत. 

लाभार्थी विद्यार्थ्यांची माध्यमानुसार आकडेवारी 
मराठी माध्यम------5 लाख 36 हजार 118 
ऊर्दू माध्यम--------10 हजार 410 
हिंदी माध्यम-------145 
इंग्रजी माध्यम------1 हजार 700 
एकूण--------------5 लाख 48 हजार 373 

मोफत गणवेश योजनेच्या लाभार्थ्यांची आकडेवारी 
सर्व मुली--------------1 लाख 42 हजार 871 
अनुसूचित जाती मुले---------11 हजार 115 
अनुसूचित जमाती मुले--------79 हजार 061 
बीपीएल कुटुंबातील मुले---13 हजार 966 
एकूण लाभार्थी-----------2 लाख 47 हजार 13 

Web Title: Free books for five and half lakh students