नाशिकला देशहितासाठी आज फुकट नोटा छपाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगारांकडून सुटीच्या दिवशी मोफत नोट छपाई
नाशिक - देशातील चलनटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर वाढीव नोटांची मागणी पूर्ण करताना मुद्रणालयात कामाचा ताण वाढला आहे. अशा स्थितीत, देशहिताचा विचार करून प्रेस कामगारांनी साप्ताहिक सुटीचे वेतन न घेता, काम करावे अशी अपेक्षा वित्त मंत्रालयाच्या प्रेस, टांकसाळ महामंडळाने केले आहे. प्रेस महामंडळाच्या आवाहानाला प्रेस कामगार मतभेद बाजूला ठेवून सकारात्मक प्रतिसाद देत साप्ताहिक सुटी असूनही मोफत काम करणार आहेत.

पाचशे व हजाराच्या नोटा बाद ठरविल्याने देशात चलनी नोटांच्या तुटवड्याचा प्रश्‍न गंभीर आहे. त्यामुळे आर्थिक कामकाजासाठी वाढीव चलनाची गरज आहे. चलनाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी मुद्रणालयांमध्ये जास्तीत जास्त चलन छपाई होण्याची गरज आहे. उद्या (ता. 20) रविवार असल्याने सरकारी आस्थापनांसह येथील मुद्रणालय व टांकसाळींना साप्ताहीक सुटी आहे. पण देशाच्या चलनाच्या गरजेचा विचार करून कामगारांनी, स्व इच्छेने सकारात्मक योगदान देऊन उत्पादनवाढीसाठी मोफत काम करावे, अशी मुद्रणालय प्रशासनाने अपेक्षा व्यक्त केली आहे.

देशातील चलनटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर देशहिताच्या व्यापक विचारातून सुटीच्या दिवशी मोफत काम करण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. त्यासाठी चलार्थपत्र मुद्रणालय प्रशासनाने यासंदर्भात आज कामगारांना आवाहान केले आहे. उद्या सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेत जास्तीत जास्त कामगारांनी मुद्रणालयात उपस्थित राहून उत्पादनवाढीसाठी योगदान द्यावे यासाठी आवाहान केले. मुद्रणालय प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत, कामगार उद्या सुटी असूनही नोट छपाईचे काम करणार आहेत.

Web Title: free currency printing in nashik