काय? महिलांसाठी मोफत दुचाकी पंक्‍चर व टोइंग सेवा?

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 8 डिसेंबर 2019

हैदराबाद येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेने महिला वर्गांमध्ये प्रचंड भीती आहे. या घटनेतील आरोपी मारले गेल्याने त्याविषयी समाधान जरी व्यक्त होत असले तरी झालेल्या घटनेविषयी भीतीचे वातावरण मात्र अजूनही कायम आहे. दिंडोरी रोडवरून रात्रीच्या वेळी महिला मेरी, म्हसरूळ, बोरगड यांसारख्या भागात प्रवास करत असतात. या मार्गावरून प्रवास करताना गाडी पंक्‍चर झाली तर अनेकवेळा जवळपास दुकान सापडत नाही.

नाशिक : हैदराबाद येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला. त्यामुळे महिला वर्गांत भीतीचे वातावरण आहे. दिंडोरी रोड परिसरातील महिलांना निर्भयपणे रस्त्याने प्रवास करता यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत पेलमहाले यांनी 24 तास महिलांसाठी मोफत दुचारी पंक्‍चर सेवा तसेच टोइंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचे दिंडोरी रोड परिसरातील सर्वांनीच कौतुक केले. 

बलात्काराच्या घटनेने महिला वर्गांमध्ये प्रचंड भीती

हैदराबाद येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेने महिला वर्गांमध्ये प्रचंड भीती आहे. या घटनेतील आरोपी मारले गेल्याने त्याविषयी समाधान जरी व्यक्त होत असले तरी झालेल्या घटनेविषयी भीतीचे वातावरण मात्र अजूनही कायम आहे. दिंडोरी रोडवरून रात्रीच्या वेळी महिला मेरी, म्हसरूळ, बोरगड यांसारख्या भागात प्रवास करत असतात. या मार्गावरून प्रवास करताना गाडी पंक्‍चर झाली तर अनेकवेळा जवळपास दुकान सापडत नाही. त्यामुळे महिलांना त्रास होतो. तसेच महिलांची फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. म्हणून येथील युवकांनी पुढाकार घेऊन दिंडोरी रोड परिसरातील महिलांसाठी मोफत पंक्‍चरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

हैदराबाद घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते पेलमहालेंचा निर्णय

यासाठी परिसरात कुठेही आपली गाडी पंक्‍चर झाली तर खालील मोबाईलवर फोन केल्यास तातडीने तेथे माणूस येऊन त्याच ठिकाणी पंक्‍चर काढून दिले जाईल. जर त्या ठिकाणी पंक्‍चर काढून देणे शक्‍य नसेल तर गाडी टोइंग करून गॅरेजला आणली जाईल. काम झाल्यानंतर संबंधित महिलेच्या ताब्यात गाडी दिली जाईल. या सुविधेमुळे सर्व प्रकारच्या त्रासांपासून महिलांची सुटका होणार आहे. ही सुविधा साई ऑटो केअर, धनोदय अपार्टमेंट, साईनगर, तोरणे हॉस्पिटलजवळ, मेरी-रासबिहारी लिंक रोड येथे उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नीलेश टिमकरे (9689431315), कुणाल पेलमहाले (9112943696) आणि लक्ष्मीकांत पेलमहाले (9021666695) यांच्याशी संपर्क साधता येईल. Image may contain: 1 person, smiling

महिलांना असुविधा होऊ नये म्हणून त्यांना ही मोफत सुविधा
हैदराबाद येथील घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिंडोरी रोड परिसरातील महिलांना दुचाकीवरून प्रवास करताना पंक्‍चर होणे किंवा वाहनाचा खोळंबा होणे अशा अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी टवाळखोरांनी गैरफायदा घेऊ नये किंवा महिलांना इतर असुविधा होऊ नये म्हणून त्यांना ही मोफत सुविधा दिली आहे. महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. - लक्ष्मीकांत पेलमहाले, साई ऍटो केअर 

हेही वाचा > शेजारच्या व्यक्तीसोबतच पत्नीचे अनैतिक संबंध कळताच...पतीने....

हेही वाचा > ती म्हणाली " माहेरची परिस्थिती गरीब आहे..पैसे कोठून आणू"..तरीही पतीने....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free two-wheeled puncture and towing service for women by social worker laxmikant pelmahale Nashik Marathi News