PHOTOS : माणुसकी निभावून दाखवूयाच!..'या' तरुणांचं ठरलं तर...

गोपाळ शिंदे : सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 December 2019

थंडी जी प्रत्येकाला वाजते, आपण शेकोटी पेटवतो,उबदार कपडे घालतो, रग-चादर-गोधडी अजून खुप काही थंडी पासुन वाचण्यास घेतो, रस्त्यावर झोपणारे गरीब लोक, आजी-आजोबा,लहान मुलं यांनी काय करावं? दिवसागणिक वातावरणातील गारव्याने उबदार घरांत राहाणाऱ्या नागरिकांची भंबेरी उडवली आहे. असे असतांना मग निर्वासितांचे काय?..असा प्रश्न शहरातील कृष्णकुंज मित्र परिवारातील तरुणांना पडला..आणि ठरवलं..

नाशिक : घोटी शहरातील कृष्णकुंज युवा मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून बुधवार ( ता. १८ ) पहाटे चार वाजेदरम्यान बेघर निर्वासित बांधवांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून मोफत उबदार कपडे,चादरी,कांबळे वाटप करण्यात आले.युवकांच्या या सामाजिक दातृत्वाची दखल शहरातील नागरिकांनी घेत कौतुकाचा वर्षाव केला.

....असे असतांना मग निर्वासितांचे काय?

थंडी जी प्रत्येकाला वाजते, आपण शेकोटी पेटवतो,उबदार कपडे घालतो, रग-चादर-गोधडी अजून खुप काही थंडी पासुन वाचण्यास घेतो, रस्त्यावर झोपणारे गरीब लोक, आजी-आजोबा,लहान मुलं यांनी काय करावं? दिवसागणिक वातावरणातील गारव्याने उबदार घरांत राहाणाऱ्या नागरिकांची भंबेरी उडवली आहे. असे असतांना मग निर्वासितांचे काय?..असा प्रश्न शहरातील कृष्णकुंज मित्र परिवारातील तरुणांना पडला..आणि ठरवलं..

Image may contain: 7 people, people smiling, people standing

आपण निर्वासित बांधवांना स्वखर्चातून उबदार कपडे,चादरी,कांबळे वाटप करू या..मग ठरलं..जे नागरिक विविध आजारांनी ग्रासलेले,धार्मिक,राजकीय,कौटुंबिक,छळातून मुक्त होण्यासाठी निर्वासित झालेल्या व शहराच्या विविध भागात आश्रयासाठी आलेल्या नागरिकांना थंडीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी पहाटे चार वाजता उठून या युवकांनी शहरातील मुख्य रस्ता,बस स्थानक,रेल्वे स्थानक,रस्त्याच्या बाजूला आदि ठिकाणी आश्रयास असलेल्या नागरिकांना मोफत उबदार कपडे,चादरी,कांबळे वाटप केले.

Image may contain: 9 people, people standing

युवकांच्या दातृत्व भावनेने निर्वासित बांधवांना अश्रू अनावर

युवकांच्या या सामाजिक दातृत्व भावनेने निर्वासित बांधवांना अश्रू अनावर झाले होते. युवकांनी सामाजिक भान जपल्याने शहरातील नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.यावेळी कृष्णकुंज मित्रपरिवाराचे श्रीकांत काळे,मनोज काळे,माधव तोकडे,सुरेश वालझाडे,सागर व्यव्हारे,कुणाल भागवत,अजय दुर्गुडे,सागर पाबळकर,निलेश वालझाडे,गणेश घोटकर,निखिल दुर्गुडे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >  मैत्रीत दगा...मित्राचाच मृतदेह टाकला शौचालयाच्या टाकीत...पण का?

Image may contain: 4 people, people sitting

PHOTO : दरवाजासमोर खेळत होती चिमुकली...अचानक 'त्याने' हल्ला करून पायाचे लचकेच तोडले... 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free warm clothes distributed to homeless people to protect them from the cold at Ghoti Nashik Marathi News