Friendship Day Special : कुछ हटके करण्याचा तरुणाईचा प्लॅन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

जुलैअखेर तरुणाईला ओढ लागते ती मैत्री दिनाची, म्हणजेच फ्रेंडशिप डेची. यंदा फ्रेंडशिप डेला ‘कुछ हटके करते हैं’ असे म्हणत अनेक प्लॅन शिजतात. ऑगस्टमधील पहिल्या रविवारी येणारा फ्रेंडशिप डे म्हणजे अनेकांसाठी पर्वणीच असते. जुन्या-नव्या सर्व मित्र-मैत्रिणींना दूरध्वनी करून किंवा भेटून आठवणींना उजाळा दिला जातो. 

जुलैअखेर तरुणाईला ओढ लागते ती मैत्री दिनाची, म्हणजेच फ्रेंडशिप डेची. यंदा फ्रेंडशिप डेला ‘कुछ हटके करते हैं’ असे म्हणत अनेक प्लॅन शिजतात. ऑगस्टमधील पहिल्या रविवारी येणारा फ्रेंडशिप डे म्हणजे अनेकांसाठी पर्वणीच असते. जुन्या-नव्या सर्व मित्र-मैत्रिणींना दूरध्वनी करून किंवा भेटून आठवणींना उजाळा दिला जातो.

मी व माझे मित्र-मैत्रिणी फ्रेंडशिप डेला दर वर्षी बाहेर कुठेतरी फिरायला जात असतो. यंदाही आम्ही शहराच्या परिसरात आउटिंगला जाणार आहोत. 
- आशिष पवार, जेल रोड

दर वर्षी फ्रेंडशिप डेसाठी मी अतिशय उत्सुक असते. सर्व नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटून त्यांच्यासोबत मैत्रीचा हा दिवस घालवणार आहे. 
- शुभांगी सुतार, स्वामिनारायणनगर

निमित्त कोणतेही असो, त्याचे सेलिब्रेशन करायचे म्हणजे मिसळ खायला जायचं हे नाशिककरांचं गणितच आहे. मी फ्रेंडशिप डेला दर वर्षी मित्रांसोबत मिसळ पार्टीचे आयोजन करत असतो. 
- सुमीत नाईक, औरंगाबाद नाका

रक्ताच्या नात्यांपेक्षा अतिशय विश्‍वासू आणि घट्ट नातं म्हणजे मित्रत्वाचे नाते होय. माझ्या आयुष्यातही हे सुंदर नातं आहे. प्रत्येक वेळी मित्र-मैत्रिणींनी मला साथ दिली आहे. प्रत्येक सुख-दुःखात माझ्यासोबत असतात. 
- स्नेहा गुरव, अशोकनगर

माझ्यासाठी माझा मोठा भाऊच जवळचा मित्र आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काहीतरी वेगळं सेलिब्रेशन मी करणार आहे. 
- साक्षी शेळके, पंचवटी

माझ्यासाठी पुस्तके हेच माझे मित्र आहेत. अनेक वाईट संकटातून ते मला बाहेर काढत आले आहेत. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने जास्तीत जास्त पुस्तके जमवून त्यांचे वाचन करण्याची शपथ मी उद्या घेणार आहे. 
- किरण दराडे, अशोक स्तंभ

महा- विद्यालयाला सुटी असल्याने अनेक मित्र-मैत्रिणींना उद्या भेटता येणार नाही. त्यामुळे मी सोमवारी सर्व मित्र-मैत्रिणींना भेटून फ्रेंडशिप डे साजरा करणार आहे. 
- स्वराज ताकाटे, निमाणी

माझ्या शाळेतील व महा-विद्यालयातील मित्र-मैत्रिणींना भेटणार आहे. आमच्या सर्व आठवणींना त्यांच्यासोबत उजाळा देणार आहे. पुढील वर्षी मी कुठे असेन सांगता येत नाही. त्यामुळे आता सोबत आहोत, तो दिवस आनंदाने साजरा करणार आहे. 
- भूमी पटेल, जेल रोड

मित्रांसोबत अंजनेरीला फिरायला जाणार आहे. मैत्रीचा दिवस असल्याने जुन्या सर्व गोष्टी विसरून नव्याने सुरवात करणार आहे. 
- अनिकेत खैरे, अमृतधाम

माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा एखादा मित्र दुरावला असेल तर त्यांना जोडण्याचा आज प्रयत्न करणार आहे. माझ्या चुकांची माफी मागून नवी सुरवात करणार आहे. 
- आकाश आमले, हिरावाडी

मैत्रीला कोणतेही बंधन नसते. त्यात अनेक रुसवेफुगवे असतात. छोट्या-मोठ्या कारणावरून भांडण होत असतं. अशी चिरंतन मैत्री टिकविणारे मित्र-मैत्रिणी मला मिळाले आहेत.
- श्‍वेता खोडे, काठे गल्ली 

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सर्व समजते ती मैत्री. आजपर्यंत माझ्या जीवनात खूप मित्र-मैत्रिणी आले, ज्यांनी अगदी कोणत्याही प्रसंगी माझी साथ सोडली नाही. मैत्री दिन साजरा करण्यासाठी कोणत्या विशिष्ट दिवसाची गरज नाहीच. 
- हर्षद भालेराव, जाधव संकुल

अगदी बालपणापासून तर शेवटच्या श्‍वासापर्यंत कुठल्याही प्रसंगी साथ न सोडणारे नाते म्हणजे मैत्री. पडत्या काळात आधारस्तंभ असतो तो फक्त मैत्रीचाच. माझी पहिली मैत्रीण आई आणि पहिला मित्र माझे बाबा आहेत.
- सोनाली गोराडे, सावरकरनगर

निःस्वार्थपणे जे जपले जाते ते मैत्रीचे अनमोल नातं असतं. रक्ताचे नसले तरी नसानसांत भिनणारे व सर्व नात्यांपासून श्रेष्ठ असे मैत्रीचे नाते असावे. जे नाते परक्‍यांनादेखील आपलेसे करते तेच अनमोल मैत्रीचे नाते असते. 
- पूजा पाचोरे, सिडको

मैत्रीचे नाते हे रक्ताच्या नात्याच्याही पलीकडचे असते. कदाचित म्हणूनच अजूनही कृष्ण-सुदाम्याच्या मैत्रीचे नाव घेतले जात असावे. 
- धर्मराज गायकवाड, अशोकनगर

मैत्रीत सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखविणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला आधार आहे. फ्रेंडशिप डेच्या निमिताने मैत्रीचे भावविश्‍व उलगडता येते. जिथे द्वेव्देषअसेल तिथे मैत्री होणे शक्‍य नाही.
- अनिकेत निकम

आयुष्यात मला साथ देणारे व जिवाला जीव देणारे असंख्य मित्र मला माझ्या रक्ताच्या नात्यांसारखे महत्त्वाचे आहेत. शरीरात असणाऱ्या अवयवांपेक्षा कमी नसते. पावसाशिवाय शेती तसेच मैत्रीशिवाय आयुष्य निरर्थक आहे.
- योगेश खैरनार, आडगाव नाका

मित्र तो नसतो जो कायम आपल्यासोबत सेल्फीमध्ये असतो. जो वाईट काळात आपल्याशी मैत्री करतो आणि सावलीसारखा सोबत राहतो. आयुष्यात वाईट प्रवाहात असताना त्यात लाट बनून आपल्याला योग्य दिशेला नेतो तो खरा मित्र.
- यतीश देसले, कॉलेज रोड 

मैत्री ही अशी सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखविणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार आहे. मैत्री ही एक प्रामाणिक आणि तरल संकल्पना आहे. जिथे आपले मत व्यक्त करायला पूर्ण स्वातंत्र्य मिळते तीच खरी मैत्री.
- सुदर्शन खैरनार, त्रिमूर्ती चौक

दर वर्षी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही सगळे मित्र भेटतो. फिरायला जातो, गप्पा, गाणी, फोटोशूट, नाश्‍ता अशी धमाल करतो. या फ्रेंडशिप डेला आम्ही मित्र-मैत्रिणी साधना मिसळ येथे मिसळ खायला जाणार आहोत. सोबतच पहिने वॉटरफॉलचादेखील प्लॅन आहे. 
- विजय ठाकरे, उपनगर

प्रत्येक व्यक्तीचा असा खास मित्र असतो, जो खूपच खास असतो. जो आपली काळजी घेतो, जो आपल्यावर प्रेम करतो, जो खरा आपला समर्थक असतो. मित्र आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे, अशा मित्रांसाठी एकच मैत्रीचा दिवस अशक्‍य आहे. माझ्यासाठी तर रोजच फ्रेंडशिप डे असतो. 
- गायत्री गनकर, जेल रोड

मित्र म्हणजे एक असा माणूस जो तुम्हाला छळतो, तुम्हाला मारतो, तुमच्या गप्प असण्यामागचे कारण ओळखतो. तुमच्या हसण्यात लपलेली वेदना ओळखतो. माझेही मित्र असेच भारी आहे.
- आदित्य गवे, नाशिक रोड

क्वालिटी टाइम विथ क्वालिटी पर्सन... मस्त मिसळ खाण्याचा प्लॅन आहे. आम्ही चार असे मित्र आहोत जे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत असतो आणि पुढेही असेच सोबत राहू. मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
- दर्शन वानखेडे, द्वारका

फ्रेंडशिप डेला बाहेर जाणे जमणार नाही. मात्र, मिसळ खाण्यासाठी आम्ही सर्व मित्र जमणार आहोत. सकाळी सेलिब्रेशन करून आणि नंतर दिवसभराची बाकी कामे करणार आहे. 
- मयूर सातभाई, जेल रोड

प्रत्येक वळणावर खूप अनोळखी लोक भेटतात. त्यातील काहीच खास होतात. जे प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहतात. नशीबवान आहे मी, की माझेही मित्र माझ्यासोबत सावलीसारखे सोबत राहतात. दर वर्षी फ्रेंडशिप डेला आम्ही दिवसभर धमाल करतो. मज्जा-मस्ती करतो, ज्यामुळे मैत्रीत आलेल्या आठवणींना उजाळा मिळतो.
- प्रशांत पवार, पंचवटी

मैत्री ही एकमेकांना मोठा आधार आहे. आपण सगळे काही मनमोकळ्या भावनेने मैत्रिणीसोबत बोलू शकतो. मैत्रीमध्ये मौज-मजा असते. त्यामुळे उद्या याचे सेलिब्रेशन करणार आहे.
- अंकिता दाभाडे, काठे गल्ली

मैत्री एक असे नाते आहे, ज्यात विश्‍वास, आदर, प्रेम, काळजी, अधिकार हे सगळं न मागता दिले जाते. रक्ताचं नसलं तरी मनाने मनाशी जोडलेले असते. शंभराच्या गर्दीत सुरक्षितता जाणवणारे असे मैत्रीचे बंधन असते. माझे मित्र माझ्यासाठी ॲन्टिव्हायरस आहेत. लव्ह यू भावांनो.
- योगेश वाघ, जेल रोड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Day Special Youth Plan Life