
Dhule News : प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुण बेपत्ता
धुळे : कुटुंबीयांनी लग्नास विरोध केल्यामुळे निराश प्रेमीयुगुलाने (Couple) शहरालगत नकाणे (ता. धुळे) तलावात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
त्यात प्रियकर तरुण बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. (Frustrated by opposition to marriage couple attempted suicide by jumping into Nakane Lake dhule news)
कल्याण रामेश्वर पाटील (वय २३, रा. वर्धाने, ता. साक्री) असे त्याचे नाव आहे. तरुणीला आपत्ती निवारण प्रतिसाद दलाच्या जवानांनी वेळीच गाठून पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. जवानाच्या सतर्कतेमुळे तरुणी बचावली.
नकाणे तलावात शुक्रवारी (ता. ३१) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, ती सायंकाळी उजेडात आली. कुटुंबीयांनी विवाहास विरोध केल्याने कल्याण पाटील व धुळे शहरातील तरुणीने (वय २१, रा. साक्री रोड) दुचाकीने नकाणे तलाव गाठला. काही वेळाने दोघांनी तलावात उडी घेतली.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर?
ही घटना तलावालगत पंपिंग स्टेशनजवळ पोहण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या राज्य आपत्ती निवारण प्रतिसाद दलाच्या जवानांना निदर्शनास आली. दल क्रमांक एकमधील जवान कन्हय्या चौधरी हा तत्काळ घटनास्थळी पोचला व त्याने तरुणीला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले. मात्र, कल्याण तलावातील खोलगट भागात गेल्याने बेपत्ता झाला.
त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तथा प्रभारी सहाय्यक समादेशक दिलीप मंडल, सुनील जगताप, दिनेश तायडे, सुरेश संघपाल, सुरेश बागड, तसेच तालुक्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, विजया पवार व पथक घटनास्थळी दाखल झाले.