मनमाडमध्ये बनावट किल्ली वापरून इंधन चोरी

मनमाडमध्ये बनावट किल्ली वापरून इंधन चोरी

मनमाड - पानेवाडी प्रकल्पातील भारत पेट्रोलियम कंपनी मधून इंधन भरून निघालेल्या टँकरमधून बनावट किल्ली वापरून इंधन चोरी करत असतांना पोलिस उपअधीक्षक राघसुधा आर यांच्या पथकाने रंगेहात पकडत कारवाई केली. इंधन माफियांनी पुन्हा डोके वर काढले असून, केवळ कंपनी व डीलरकडे चावी असतांना बनावट किल्ली आली कुठून त्यामुळे बनावट किल्ली तयार करणाऱ्या रॅकेटचा सुगावा लावण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे आहे 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मनमाड पासून जवळ असलेल्या पाणेवाडी इंधन प्रकल्पातून उत्तर महाराष्ट्रात इंधन पुरवठा केला जातो. त्यामुळे मोठ्या संख्येने येथील इंधन प्रकल्पातून इंधन भरलेले टँकर बाहेर पडतात. भारत पेट्रोलियम कंपनीतून एम एच ४३ ई १७८१ हा टँकर इंधन भरून बाहेर पडला. नेहमीप्रमाणे जात असतांना कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून ठरलेल्या ठिकाणी थांबत चालक रवींद्र सोपान वडघुले (रा मांडवड) याने बुरकुलवाडी परिवारात टँकर थांबविला. आणखी तीन साथीदार कारमध्ये कॅन घेऊन उभे होते चालकाने टँकरला लावलेले लॉक आपल्या जवळ असलेल्या बनावट किल्लीने उघडून कॅनमध्ये डीझल भरत असतांना इंधनच्या होणाऱ्या काळाबाजार संबंधी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस उपअधीक्षका राघसुधा आर यांच्या पथकाने छापा मारला. यामध्ये चालक हाती लागला असून, आणखी तीन जण फरार झाले आहे. इंधनाने भरलेला टँकर, कार, इंधनाने भरलेली कॅन असा सुमारे सहा लाखाचा ऐवज जप्त केला. तर बनावट किल्ली, कुलूपही जप्त केले आहे. मनमाड पोलिस स्थानकात इंधनच्या काळाबाजाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार झालेल्या तीन आरोपींचा शोध घेत आहे. व पुढील तपास करत असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी सांगितले. 

कंपनीतून टँकर इंधन भरून निघतो. त्यावेळेस कंपनीचे अधिकारी टँकरला लॉक करतात. त्याची एक किल्ली डीलरकडे तर एक कंपनीकडे ठेवतात. त्यामुळे या गोपनीय किल्लीची माहिती कोणालाच नसते. असे असतांनाही टँकरच्या लॉकची बनावट किल्ली करून इंधनाचा काळाबाजार केला जातो. या काळाबाजाराने उपजिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्यात आले. त्यानंतर मनमाडमध्ये इंधन माफियांचा  काळाबाजार बंद झाला होता. मात्र पुन्हा एकदा या इंधन माफियांनी डोके वर काढले असून, याला वेळीच आळा घातला गेला नाही तर पुन्हा सोनवणे हत्याकांड ताजे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामध्ये एक मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com