#full2smart फुल टू स्मार्ट उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

आळेफाटा व परिसरातील विविध मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आज (ता.3) सकाळच्या फुल टू स्मार्ट उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान वडगाव आनंदच्या श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सकाळ फुल टू स्मार्टची प्रतिकृती सादर करून उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले.
 

आळेफाटा - आळेफाटा व परिसरातील विविध मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आज (ता.3) सकाळच्या फुल टू स्मार्ट उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान वडगाव आनंदच्या श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सकाळ फुल टू स्मार्टची प्रतिकृती सादर करून उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले.

आळेफाटा व परिसरातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सकाळच्या फुल टू स्मार्ट उपक्रमात सहभाग घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव आनंद येथील श्रीमती रेऊबाई बाळाजी देवकर विद्यालयात सकाळच्या फुल टू स्मार्ट उपक्रमाच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उल्हास देवकर, मुख्याध्यापक श्री. जाधव, चित्रकला शिक्षक एम. बी. कुसाळकर, वरिष्ठ शिक्षिका रजनी डुंबरे, सकाळचे वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक दीपक महाडिक, सकाळचे बातमीदार अर्जुन शिंदे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

दरम्यान, आळेफाटा परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कुल, जे. व्ही. पाटील इंग्लिश मीडियम स्कुल, शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय, आळे येथील ज्ञानमंदिर हायस्कुल, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कुल, राजुरी येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तसेच बेल्हे येथील श्री बेल्हेश्वर विद्यालय, मॉडर्न इंग्लिश स्कुल आदी शाळांमध्येही सकाळच्या फुल टू स्मार्ट उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सकाळचे वितरण विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक दीपक महाडिक यांनी सकाळच्या साथीने दहावी अभ्यासमाला या खास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत  आत्मविश्वासाने सामोरे जाण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना स्वतःची आवड जोपासण्याचे आवाहन केले.

Web Title: #full2smart The students' spontaneous response to the full2smart initiative