धुळे तालुक्यातील रस्ते, पुलांसाठी २५ कोटी  ​

धुळे तालुक्यातील रस्ते, पुलांसाठी २५ कोटी  ​

धुळे ः राज्याच्या अर्थसंकल्पात धुळे तालुक्यातील रस्ते व पुलाच्या कामांसाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. या रस्ते, पुलाच्या कामांमुळे तालुक्यातील दळणवळण वाढून विकासालाही चालना मिळेल असा विश्‍वास आमदार श्री. पाटील यांनी व्यक्त केला. 

आवश्य वाचा- पदरमोड करत रस्ता दुरुस्ती; चारशे मीटर रस्‍त्‍याचे खडीकरण

धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे व्हावीत यासाठी आपण सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील विविध रस्ते व पुलांना मंजुरी मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्याही वारंवार बैठका घेऊन रस्ते व पुलांचे आराखडे तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या प्रस्तावातील रस्त्यांचा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समावेश करून मंजुरी मिळवून घेतली आहे. या कामांसाठी एकूण २५ कोटी ५९ लक्ष ८८ हजार रुपयांना मंजुरी मिळाली असल्याचे आमदार श्री. पाटील यांनी म्हटले आहे. 

या रस्त्यांची कामे होणार 
मंजूर झालेल्या रस्त्यांमध्ये कापडणे ते राष्ट्रीय महामार्ग-३ देवभाने फाटा (दोन कोटी रुपये), कापडणे गावात काँक्रीटीकरण ( तीन कोटी ५० लाख), बिलाडी ते न्याहळोद ( दोन कोटी ७५ लाख), नवलनगर-सातरणे ते मोहाडी (चार कोटी ६५ लाख), आर्वी-शिरुड १७ किलोमीटर सुधारणा करणे ( दोन कोटी ७५ लाख), देऊर ते नांद्रे सुधारणा करणे ( ८० लाख), रावेर ते चितोड सुधारणा करणे ( एक कोटी ९०), मुकटी-वेल्हाणे-शिरुड प्रजिमा २४ किलोमीटर सुधारणा करणे (६५ लाख), निमगुळ ते नवे गाव निमगुळ (निमगुळ खोरदड रस्ता ग्रामा ५३) बोरी नदीवर पुलाचे बांधकाम करणे (चार कोटी ४९ लाख ८८ हजार), नकाणे-वार-सुट्रेपाडा दरम्यान लहान पुल (६० लाख), कन्हेरी नदीवर फागणे ते बाळापूर दरम्यान लहान पुल (एक कोटी ५० लाख रुपये). या कामांचा यात समावेश आहे. या सर्व कामांमुळे शेतकरी, नागरिक व वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com