
PM Gram Sadak Yojana | रस्तेविकासासाठी 80 कोटी : खासदार डॉ. भामरे
धुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील रस्त्यांच्या (Road) कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्रीय प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत प्रस्तावित १०५ किलोमीटरच्या कामांसाठी सरासरी ८० कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर झाला,
अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा संसदरत्न खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. (fund of 80 crore 51 lakhs has been approved for proposed 105 km works under Pm Gram Sadak Yojana dhule news)
मतदारसंघातील धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव व बागलाण तालुक्यातील काही प्रमुख रस्त्यांचा समावेश प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत झाला. या प्रमुख रस्त्यांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला.
त्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत संबंधित रस्त्यांच्या कामाचा समावेश होण्यासाठी केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरीराज सिंग, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. या अनुषंगाने केंद्राने सरकारने कामांना मंजुरी दिली. ती अशी :
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
धुळे ग्रामीण : शिरूर-विंचूर ते दोंदवाड या ७.४७ किलोमीटर रस्त्यासाठी पाच कोटी ५८ लाख, बाळापूर-वडजाई ते पिंप्री या ७.८८ किलोमीटरसाठी पाच कोटी १६ लाख, निमडाळे ते खेडे या साडेसहा किलोमीटरसाठी चार कोटी ९८ लाख, वडजाई ते नरव्हाळ या सरासरी चार किलोमीटरसाठी दोन कोटी ९० लाख, नेर (महाल नूरनगर) ते कावठी या ७.७० किलोमीटरसाठी पाच कोटी ६२ लाख.
शिंदखेडा : शिंदखेडा ते वरूळ या पाच किलोमीटरसाठी दोन कोटी ७९ लाख, राज्य महामार्ग तीन ते माळीच, तेथून कलमाडी ते वाघाडी बुद्रुक व तेथून कंचनपूर या १४.५२ किलोमीटरसाठी ११ कोटी ८० लाख, हुंबर्डे ते पाष्टे, बेटावद या ११.३० किलोमीटरसाठी नऊ कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर झाला. उर्वरित निधीतून मालेगाव, बागलाण क्षेत्रात कामे होतील. लवकरच संबंधित कामांची निविदाप्रक्रिया पार पडून ती सुरू केली जातील, असे डॉ. भामरे यांनी सांगितले.