निधीची गरज नसलेल्या ठिकाणीच निधीची उधळण

निधीची गरज नसलेल्या ठिकाणीच निधीची उधळण

संग्रामपूर- ग्रामीण भागात आमदार निधीची गरज नसलेल्या ठिकाणी उधळण सुरू असल्याचा प्रकार संग्रामपूर तालुक्यातील बोडखा भिलखेड रस्त्यावरील कामामुळे उजेडात आला आहे.

आमदार निधीतुन नागरिकांच्या सोयी नुसार कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर असते तेच अधिकारी ग्रामीण भागातील अशा कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने बरेच ठिकाणी निधीचा दुरुपयोग होत असल्याची ओरड होत आहे. बोडखा ग्रामपंचायत अंतर्गत प्रवाशी निवारा बाधकाम साठी आमदार निधीतुन निधी टाकण्यात आला. या कामातून जास्तीची रक्कम उरली पाहिजे. यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यानी भिलखेड येथील एका व्यक्तीला हाताशी धरून हा प्रवाशी निवारा दोन्ही गावे सोडून चक्क जगलांत बांधणे सुरू केला आहे.

इतकेच नाही तर पावसाळ्याचे पाणी वाहून जाणारे नालीत ह्या निवाऱ्या चे बांधकाम होत असल्याने पाण्याचा नैसर्गीक प्रवाह अडविला जाणार आहे. यामुळे सदर पाणी बाजूचे शेतातून मार्ग काढून वाहणार असल्याने त्या शेतकर्याचे होणारे नुकसानास जबाबदार कोण राहणार. असाही प्रश्न निर्माण होत आहे. हा निवारा एकाही गावातील नागरिकांच्या हिताचा ठरणारा नसताना नेमका कुणाच्या आग्रहास्तव बांधकाम होत आहे . याची चौकशी होणे गरजेचे ठरत आहे व इतका मोठा निधी वायफळ जागी खर्च करण्या मागील राजकारण तरी काय? याचाही खुलासा संबंधित अधिकाऱ्याकडून होणे गरजेचे ठरू पाहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com