'ताहाराबाद'ने केले मृत हरणावर अंत्यसंस्कार

प्रफुल्ल कुवर
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

ताहाराबाद(नाशिक) : बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील मळगाव भामेर येथील डोंगर पायथ्याच्या जंगलात चिंकारा जातीच्या हरणाची शिकार ११ नोव्हेंबरला रात्री करण्यात आली. दरम्यान आज (ता. १३) सकाळी ताहाराबाद वन परिक्षेत्र कार्यालय आवारात सदर मृत हरणावर शव विच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आला. वैद्यकीय पथकाने महत्वाचे अवयव नमुने मुंबई येथील रिसर्च सेंटर येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले. तीन आरोपी ताब्यात असून उर्वरित फरार आरोपींचा शोध संबंधित विभाग घेत आहे. , अशी माहिती ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश कांबळे यांनी दिली. 

देशात ‘अवनी’ वाघिणीला मारण्याचे प्रकरण ताजे असताना बागलाण या आदिवासी गावाच्या जंगलात जिभाऊ तुळशीराम पवार (अंबासन) व गुजरत मधील करंजडी येथील शिकारी तुळशीराम सखाराम बागुल, शैलेश सोन्या बागुल यांच्यासह अन्य सात जणांनी चिकारा जातीच्या हरणाची शिकार कुत्र्याच्या मदतीने केली होती. स्थानिक नागरिकांनी वन विभाग कर्मचाऱ्यांची मदत घेऊन तीन संशयित आरोपी, दीड लाख रुपये किमतीच्या पाच मोटार सायकली, पातेले, कोयता, चाकू, व दोरी ताब्यात घेतले होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळे, वनपरिमंडळ अधिकारी कृष्णा बोरसे, पंकज परदेशी, वनरक्षक ए.डी.हेंबाडे, के.एम.आहिरे, यांनी सदर आरोपी व मुदेमाल यांना ताब्यात घेऊन सटाणा न्यायालयात हजार केले असता तीन दिवसाची पोलीस कष्टडी देण्यात आली. १२ नोव्हेंबरला सायंकाळी सटाणा येथील पोलीस स्टेशन कोठडीत तीनही आरोपींना ठेवण्यात आले होते.  कांबळे यांनी दोन वनकर्मचारी यांची रात्री सांभाळण्यासाठी नियुक्ती केली होती. सटाणा पोलीस अधिकारी यांनी सटाणा पोलीस स्टेशन आरोपींना ठेवण्यासंदर्भात लेखी आदेश नसल्यामुळे सदर आरोपींना मध्यरात्री ताहाराबाद येथील वनपरिमंडळ अधिकारी यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आल्याने वनविभागाला अडचणींना सामोरे जावे लागले. आज प्रभारी सहायक आयुक्त पशुसंवांर्धन डॉ. सी. पी. रुद्रवंशी, डॉ. ए. ए. खान, डॉ. एस. सी. कोकणी, यांनी उपस्थित वनअधिकारी, कर्मचारी व पंच यांच्यासमोर मृत हरणाचे शवविच्छेदन करूनं महत्वाचे अवयव तपासणीसाठी मुंबई येथील रेसर्च सेंटर येथे पाठविण्यात आले. दुपारी तीनही संशयित आरोपींचे रूग्णालयात आरोग्य तपासणी करून पुढील फरारी संशयित आरोपीचा शोध घेण्याकरिता त्यांची कसून चौकशी होत आहे. 

''गुजरात शासनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने वन विभागास प्रत्येक वनपरिक्षेत्र कार्यालयास स्वतंत्र कोठडी, अधिकारी व कर्मचारी यांना शस्त्र वाहन, वॉकीटोकि, आदी महत्वपूर्ण गरजा पुरविल्यास जंगल संवर्धन व्यवस्थित होईल आणि वनअधिकारी व कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताण कमी होणार आहे. तसेच वन्य जीवांसाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक झाल्यास वनविभागास क्षेत्रीय कामावर अधिक वेळ व लक्ष देता येणार आहे. कारण वन्य जीवांच्या घटना अधिक घडत असल्याने वन अधिकारी व कर्मचारी यांना तपास व कोर्ट कामासाठी कामासाठी अधिक वेळ द्यावा लागत असल्याने मूळ जंगल संवर्धनाचे उद्दिष्टे मागे पडत आहे.'' 
- अरुणकुमार भामरे , निसर्गमित्र

Web Title: funeral and dissection of the deer body dead in hunting