गरीब मुलींना दिला स्वयम रोजगाराचा हात

गरीब मुलींना दिला स्वयम रोजगाराचा हात

गरीब मुलींना दिला स्वयम रोजगाराचा हात 


जळगावः होतकरू व गरीब मुलींना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देवून शिक्षणाला हातभार लावण्याचे काम एका महिलेने यशस्वीपणे पेलले आहे. आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक मुलींना अद्ययावत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देवून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्याचे सविता बोरसे यांनी कार्य केले. त्यांची सेवा अविरतपणे सुरू आहे. 
कासोदा (ता. एरंडोल) येथील सामान्य घरातील सविता बोरसे यांना आधीपासूनच ब्युटी पार्लरचे आवड होती. पती संजय बोरसे शिक्षक असल्याने सविता बोरसे यांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेण्यासाठी जळगाव येथील शासकीय मुलींचे आयटीआय येथे पार्लरचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले. दीड- दोन वर्ष अपडाऊन करून केल्यानंतर तसेच मुंबई, पुणे येथे जाऊन अद्यायावत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेऊन ग्रामीण भागात असलेले कासोदा येथे ब्युटी पार्लरला सुरवात केली. त्यालाच कौशल्य विकासाची जोड देत ग्रामीण भागातील गरीब मुलींना त्यांच्या पायावर उभे करण्याचा विचार त्यांनी केला. अन्‌ ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. जास्तीत जास्त ग्रामीण भागातील मुलींना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करण्याचा मानस सविता बोरसे यांचा आहे. 
कासोदा येथे ब्युटी पार्लर तसेच प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्यानंतर सविता बोरसे यांनी त्यांची कार्याचा विस्तार वाढवीत एरंडोल येथे ब्युटीपार्लरची शाखा उघडून तेथील दीडशे गरीब मुलींना सद्या प्रशिक्षण मोफत देण्याचे काम सुरू केले आहे. तसेच आयुर्वेद पंचकर्माचे देखील त्या देत आहे. 

कुटुंबाची मिळाली साथ 
सवित बोरसे ब्युटी पार्लरच्या प्रशिक्षणाचे काम वाढविण्यासाठी त्यांचे पती संजय, सासू, सासरे यांची महत्त्वाची साथ मिळाली. महिलेला घरासोबत बाहेरील काम सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. त्याच प्रमाणे सविता बोरसे यांना देखील तारेवरची कसरत करावी लागत असली तरी त्या यशस्वीपणे ब्युटी पार्लर प्रशिक्षण वर्गासोबत कुटुंबाचा देखील सांभाळ यशस्वीपणे करत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com