esakal | शेगाव संस्थानकडून पुरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाखांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Cm@Shegaon

श्री गजानन महाराज संस्थानकडून कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पुरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लक्ष रुपयांचा मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.

शेगाव संस्थानकडून पुरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाखांची मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेगाव : श्री गजानन महाराज संस्थान शेगावतर्फे राज्यातील पूरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात आला. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री शेगाव येथे आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठ पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर पाटील यांनी मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.  

केंद्रीय मंत्री नामदार संजय धोत्रे, डॉ. संजय कुटे, गिरीष महाजन, डॉ. रणजित पाटील, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांचेसह अन्य स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.

श्री गजानन महाराज संस्थानकडून कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पुरग्रस्तांसाठी 1 कोटी 11 लक्ष रुपयांचा मदतनिधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. याप्रसंगी श्री संस्थानचे विश्वस्त मंडळीही उपस्थित होते.

loading image
go to top