PHOTO : बेधडक कारवाईत जुगारअड्‌डा उद्‌ध्वस्त..चक्क 'इतका' मुद्देमाल हस्तगत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना मालेगाव स्टॅंड परिसरातील भारत मशिनरीशेजारी असलेल्या दिशान चायनीजच्या तळघरात कल्याण मटका जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, अवैध धंदेविरोधी पथकाने गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास छापा टाकला. जुगारअड्डा संशयित कपिल जाधव याच्या मालकीच्या बंदिस्त खोलीत सुरू होता.

नाशिक : पंचवटी कारंजा पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालेगाव स्टॅंड परिसरात मटका जुगारअड्‌डा अवैध धंदेविरोधी पथकाने छापा टाकून उद्‌ध्वस्त केला. गुरुवारी (ता. २१) दुपारी झालेल्या या कारवाईत पोलिसांनी १२ जुगाऱ्यांना ताब्यात घेत सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन आठवड्यांत पथकाने ठिकठिकाणी कारवाई करीत साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

दोन आठवड्यांत पथकाडून लाखोंचा मुद्देमाल जप्त 

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना मालेगाव स्टॅंड परिसरातील भारत मशिनरीशेजारी असलेल्या दिशान चायनीजच्या तळघरात कल्याण मटका जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, अवैध धंदेविरोधी पथकाने गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास छापा टाकला. जुगारअड्डा संशयित कपिल जाधव याच्या मालकीच्या बंदिस्त खोलीत सुरू होता. पथकाने नाशीर शेख (वय 45, रा. गंजमाळ), नितीन अटक (38, रा. मुंबई नाका), रमेश कुऱ्हाडे (40, रा. देवळाली कॅम्प), संजय कांबळे (35, रा. पंचवटी), जितेंद्र कांबळे (48, रा. पंचवटी), बाळू साठे (46, रा. पंचवटी), अनिकेत अभ्यंकर (24, रा. रविवार कारंजा), संदीप चांडक (42, रा. रविवार कारंजा), देवीदास पाटील (45, रा. रविवार कारंजा), राकेश करमचंदाणी (29, रा. म्हसरूळ), राम घोडके (31, रा. रविवार कारंजा) हे संशयित कल्याण मटका, टाइम लाइन जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून 33 हजार 150 रुपये, जुगाराचे साहित्य असा एक लाख 71 हजार 156 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

Photo : आयुक्तांच्या अवैधधंदेविरोधी पथकाने मालेगाव स्टॅण्ड येथे सुरू असलेल्या अवैध मटका अडड्यावर कारवाई करीत ताब्यात घेतलेले संशयित जुगारी.

हेही वाचा > नाशिकच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल

आयुक्‍तांच्या पथकाची बेधडक कारवाई 
आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र अवैध धंद्यांविरोधातील सहाय्यक निरीक्षक कुंदन सोनोने यांचे पथक तयार केले आहे. या पथकाने दोन आठवड्यांत सरकारवाडा, पंचवटी, सातपूर, अंबड, नाशिक रोड, उपनगर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत डझनभर जुगारअड्ड्यांवर छापे टाकून नऊ लाख 36 हजार 34 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या पथकाच्या बेधडक कारवाईचा जुगारअड्ड्यांपेक्षा पोलिस ठाण्यांनीच अधिक धसका घेतला आहे.  

क्लिक करा कॅनडात नोकरी मिळणार म्हणून 'ते' खूश होते...पण..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gambling Destroyed In police action Nashik Crime News