सामूहिक बलात्कारप्रकरणी तिघांना जन्मठेप, चौघांना कारावास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नाशिक रोड - विहितगाव परिसरातील शंकर हांडोरे यांच्या मळ्यात चोवीस वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकरासमोर सामूहिक बलात्कारप्रकरणी न्यायालयाने तीन आरोपींना वीस वर्षांची जन्मठेप, तर चौघांना सहा महिने कारावास व दंड सुनावला.

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी 2014 मध्ये घडलेल्या या घटनेत पीडित तरुणी व तिचा प्रियकर सायंकाळी सहाच्या सुमारास रोकडोबावाडी परिसरातील प्रसिद्ध अण्णा गणपती मंदिराच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्या वेळी प्रमोद सीताराम गरुड, खुशा भगवान भदरंगे, विजय साहेबराव उगले, कैलास गणेश बाराहाते, अनिल दिलीप सदाशिव, दीपक मच्छिंद्र ढोके, जगू प्रतीक वानखेडे (सर्व रा. रोकडोबावाडी, देवळालीगाव) हे पीडित मुलगी व तिच्या प्रियकराजवळ गेले. प्रियकराला दमदाटी करत मारहाण करून त्याच्यासमोर सामूहिक बलात्कार केला.

उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी पीडित मुलीने गुन्हा दाखल केला. महिला पोलिस उपनिरीक्षक एम. एस. बकाल यांनी घटनेचा तपास केला. न्यायालयाने प्रमोद गरुड, खुशा भदरंगे, जगू वानखेडे यांना दोषी ठरवत जन्मठेप, तर विजय उगले, कैलास बाराहाते, अनिल सदाशिव, दीपक ढोके यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Web Title: gang rape case Life imprisonment crime punishment