धुळे : सामुहिक अत्याचार प्रकरणी चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

चार दिवसापूर्वी ही सामुहिक अत्याचाराची घटना घडली होती. ही घटना शेवडीपाड्याच्या माजी पोलिस पाटलाने दडपून ठेवली. गावात कुणीही वाच्यता करत नव्हते. पीडित मुलीला वैद्यकिय उपचार मिळत नव्हते.

धुळे - साक्री तालुक्यातील उंबरठीत २० वर्षीय तरुणीवर (रा. शेवडीपाडा) सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी पिंगणच्या (बागलाण) 4 मजूर आरोपींना आज (रविवार) पहाटे पिंपळनेर पोलिसांनी अटक केली.

चार दिवसापूर्वी ही सामुहिक अत्याचाराची घटना घडली होती. ही घटना शेवडीपाड्याच्या माजी पोलिस पाटलाने दडपून ठेवली. गावात कुणीही वाच्यता करत नव्हते. पीडित मुलीला वैद्यकिय उपचार मिळत नव्हते. ही माहिती शनिवारी रात्री दहाला मिळाली. 

पोलिसांनी सुनिल भाबड यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ सहकारी तपास पथक रवाना केले. त्या पीडित मुलीला बंदोबस्तात जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले असून रात्रीतूनच आरोपितांना ताब्यात घेतले.

Web Title: gang rape in dhule district