विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

विद्यार्थिनी शाळेत गैरहजर? 
नवापूर तालुक्‍यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, धनराट येथे शिक्षण घेत असलेली दहावीतील पीडित विद्यार्थिनी ही डिसेंबरपासून शाळेतून पालक घरी घेऊन गेल्याची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे पीडित विद्यार्थिनी गेल्या दीड महिन्यांपासून शाळेत गैरहजर असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी "सकाळ'ला दिली. 

नवापूर - धनराट (ता. नवापूर) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुजरात राज्यातील एका शेतात मकरसंक्रांतीच्या दिवशी सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 जानेवारीला नवापूर तालुक्‍यातील एका गावातून एका 15 वर्षीय मुलीला खोटे बोलून गिरीश नावाच्या संशयिताने मोटारसायकलवर बसवून धुळीपाडा (ता. नवापूर) येथे नेले. रात्री मामाकडे मुक्काम केला. त्यानंतर 15 जानेवारीला गिरीश हा सकाळी गुजरात राज्यातील सोनगढ येथे पैसे घेण्यासाठी गेले. त्यावेळी संदीप व श्रेयश व दोन मित्रांनी पीडित मुलीला गिरीश बोलवत असल्याचे सांगून गुजरात राज्याच्या उच्छल तालुक्‍यातील माणिपूर येथे एका शेतात नेले. तेथे संदीप, श्रेयस आणि दोन मित्र (संपूर्ण नाव माहिती नाही) या संशयितांनी पीडित मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिला मोटारसायकलवर बसवून नवापूर शहरातील तीन-चार किलोमीटर अंतरावर असलेल्या एमआयडीसीजवळ रात्री दहा ते बाराच्या सुमारास आणून सोडून दिले. 

पीडित विद्यार्थिनीने संपूर्ण प्रकार आपल्या घरी येऊन आईवडिलांना सांगितला. नवापूर पोलिस ठाण्यात संबंधित संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश पवार, सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील, पोलिस उपनिरीक्षक योगिता पाटील, पोलिस नाईक अनिल राठोड, आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्पाधिकारी वान्मती सी., नवापूर तहसीलदार सुनीता जऱ्हाड, नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांनी घटनेची चौकशी केली व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, धनराट येथे भेट दिली. नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक डी. एस. शिंपी तपास करीत आहेत. 

विद्यार्थिनी शाळेत गैरहजर? 
नवापूर तालुक्‍यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, धनराट येथे शिक्षण घेत असलेली दहावीतील पीडित विद्यार्थिनी ही डिसेंबरपासून शाळेतून पालक घरी घेऊन गेल्याची नोंद रजिस्टरमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे पीडित विद्यार्थिनी गेल्या दीड महिन्यांपासून शाळेत गैरहजर असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी "सकाळ'ला दिली. 

Web Title: gang rape on girl students