चोरांची टोळी बारा तासांत जेरबंद ; वाचा

सिन्नर.jpg
सिन्नर.jpg

सिन्नर : शहरातील चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्‍सच्या गाळ्यात असणाऱ्या बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम काही अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला  या वेळी सिन्नर पोलिसांनी तातडीने तपास करुन पाच संशयिताना बारा तासांच्या आत जेरबंद केले आहे.

एक आरोपी फरार ; मुद्देमाल जप्त

जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह, अप्पर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस उपअधीक्षक माधव पडिले यांच्या सूचनेनुसार चोरट्यांच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.  मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरटे हे घोटी रोडवरील बंधन लॉन्स परिसरात येणार असल्याचे पोलिसांना समजले. त्याप्रमाणे सापळा रचून पोलिसांनी ओंकार संजय कांबळे (रा. मुंब्रा, हल्ली वंजार गल्ली, सिन्नर), आकाश किशोर खलसे (रा. भिमनगर भाजी मंडई, पिंप्री चिंचवड, हल्ली भाटवाडी शिवार, सिन्नर) यांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीवरुन त्यांचे साथीदार हे भोकणी शिवारातील साईसेवा पेट्रोल पंपावर येणार असल्याचे समजले.

त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचुन अमोल संजय बोराडे (वय 20, रा.वाडीवऱ्हे, ता.इगतपुरी), अशोक निवृत्ती जाधव (रा.म्हसुर्ली, ता.इगतपुरी) यांना ताब्यात घेतले. तर पाचवा आरोपी नागेश विश्‍वनाथ वाव्हळ (वय 30) यास पांडवनगरी, सिन्नर येथुन जेरबंद केले. मात्र अक्षय निवृत्ती जाधव हा आरोपी फरार झाला असून पोलिसांनी या पाचही आरोपींना अटक केली. या आरोपींनी एटीएम फोडण्याच्या गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार पोलिसांनी जप्त केली तर एटीएम फोडण्यासाठी वापरलेली हत्यारेही ताब्यात घेतली 

दहा लाखांची रोकड सुरक्षित
बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये आदल्या दिवशीच दहा लाखांची रक्कम टाकली होती. मध्यरात्रीच्या सुमारास फोडलेल्या या मशीनमधुन मात्र चोरट्याना ही रक्कम काढण्यात यश आले नाही. मशीन भक्कम असल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com