गणगौर मेळाव्यात स्पर्धांमुळे रंगत

गणगौर मेळाव्यात स्पर्धांमुळे रंगत

धुळे - येथील अग्रवाल महिला मंडळातर्फे टॉवर उद्यानात आज सायंकाळी गणगौर मेळाव्यात विविध रंगतदार स्पर्धा झाल्या. उद्यानात महिलांसह तरुणींची गर्दी होती.

गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या गौरी तृतीयेला गणगोर उत्सवाची सांगता होते. माहेरी आलेल्या गौरी म्हणजे पार्वती मातेला सासरी न्यायला श्री महादेवाचे आगमन झालेले असते, अशी आख्यायिका आहे. तत्पूर्वी, होळीनंतर गणगोर उत्सवासह पूजेला सुरवात होते. पार्वतीमाता व श्री महादेवाची प्रतिमा मांडून पूजा केली जाते. तसेच शीतलमातेच्या पूजेनंतर कुंभाराकडून घरोघरी मातीची गणगोर इसर (महादेव) दोन जोडी व गणपती आणले जातात. अशा गौरीचे सायंकाळी आगमन होते आणि पूजा केली जाते. नैवेद्य दाखविला जातो. या विधीसह मेळावा, त्यात विविध स्पर्धा टॉवर उद्यानात झाल्या. अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा हेमलता अग्रवाल, उपाध्यक्षा भारती सिंघानिया, सचिव संगीता अग्रवाल, कोशाध्यक्षा मोनिका अग्रवाल, सहसचिव रितू आशिष पटवारी आदींसह सदस्या उपस्थित होत्या. तरुणींनी आकर्षक पेहराव करत मेळाव्यात हजेरी लावली. विविध स्पर्धांत सहभाग नोंदविला. या उपक्रमास अग्रोहा विकास ट्रस्ट, अग्रवाल युथ क्‍लब, जमनालाल बजाज युवक मंडळाचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com