सटाण्यात अभूतपूर्व वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

सटाणा : शहर व परिसरातील हजारो गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला काल रविवार (ता. 23) रोजी भावपूर्ण निरोप दिला. दरवर्षी लवकर सुरु होणारी मुख्य विसर्जन मिरवणूक शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री उशिरा तब्बल साडेआठ वाजता सुरु होऊन अभूतपूर्व उत्साहात शांततेत पार पडली. गणरायाला निरोप देण्यासाठी शहरवासीयांचा आनंद ओसंडून वाहत होता. मिरवणुकीत गुलालाच्या उधळणीमुळे उद्भवणारे प्रदूषण टाळण्यासाठी जवळपास सर्वच मंडळ व सामाजिक संघटनांनी झेंडूच्या फुलांची उधळण केली. त्यामुळे मिरवणूक मार्गावर सर्वत्र झेंडूच्या फुलांचा खच पडल्याचे चित्र होते.

लाडशाखीय वाणी समाज मंडळाने ध्वनीप्रदूषणमुक्तीसाठी मिरवणुकीत भजनी मंडळातर्फे सादर झालेल्या गीतांवर महिलावर्गाने केलेल्या फुगड्या विशेष आकर्षण ठरले. विसर्जन मार्गावर आजपर्यंत मशिदीसमोरच मुस्लीम बांधवांकडून गणेश मंडळांचे स्वागत होत असे, मात्र नगराध्यक्ष सुनील मोरे मित्र मंडळातर्फे समको बँकेसमोर स्वतंत्र व्यासपीठ उभारून नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी व फुलांची उधळण करीत 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', या जयघोषाने सटाणा शहर काल दुमदुमून गेले होते. शहरातील 25 ते 30 मंडळांनी थेट मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता सायंकाळी 5 वाजेपर्यंत तर रात्री उशिरा सर्व मानाच्या गणपतींचे ठेंगोडा (ता.बागलाण) येथील गिरणा नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. 

यंदा गणेशोत्सवात शहरातील लहान-मोठ्या 75 सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी झाली होती. दरवर्षी तहसील कार्यालयाच्या आवारात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व मंडळे एकत्रित येऊन मिरवणूकीची सुरुवात करतात. मात्र शहराच्या इतिहासात प्रथमच मुख्य मिरवणुकीस तब्बल साडेआठ वाजता सुरुवात झाली. शहरातील राजमाता जिजाऊ मित्र मंडळ, आर. एन. डी. आर. मित्र मंडळ, जय भद्रा मित्र मंडळ, कॅप्टन अनिल पवार चौक, धनगर गल्लीचा राजा, पाच पिंपळी मित्र मंडळ, नाशिक नाका मित्र मंडळ व मानाचा असलेल्या मालेगाव रोड मित्र मंडळ या प्रमुख मंडळांनी आपापल्या गणेशमूर्ती सजविलेल्या ट्रक्टर ट्रोलीसह ढोल ताशे, बेंड, तसेच इतर वाद्य व रोषणाईसह ताहाराबाद नाक्यावर सायंकाळी आठ वाजेपासून आणण्यास सुरुवात केली. काही गणेश मंडळांनी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले गणेश विसर्जन आटोपले. तर काही मंडळांनी पाचव्या, सातव्या दिवसानंतर आपापल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले.

उर्वरित गणेश मंडळे पारंपारिक विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती. तहसील आवारापासून (कै.) पं.ध.पाटील चौकमार्गे विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरून ढोल ताशांच्या गजरात व फुलांची उधळण करीत एकेक गणेश मंडळ पुढे सरकू लागले. रस्त्याच्या दुतर्फा विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी गणेश भक्तांची अलोट गर्दी उसळली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, गणेश बुवा यांच्यासह पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Web Title: ganpati visarjan at satana