शहरात पुन्हा जागोजागी साचला कचरा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

जळगाव - महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 25 जूनला राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यानुसार 1 ऑगस्टला मतदान व 3 ऑगस्टला मतमोजणी झाली. या दीड महिन्याच्या कालावधीत शहरात पुन्हा जागोजागी अस्वच्छता तसेच पावसामुळे रस्त्यांची चाळण झाल्याने या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. 

महापालिकेची निवडणूक असल्याने दीड महिन्यापासून मनपाचे प्रत्येक विभागातील अधिकारी ते कर्मचाऱ्यांकडे निवडणूक कामांचे जबाबदारी दिली असल्याने महापालिकेतील इतर कामांना थांबा मिळाला होता. त्यात शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा देखील कामे व्यवस्थित न झाल्याने शहरातील विविध भागात कचरा साचलेला आहे. 

नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात 
शहरात अस्वच्छता वाढली असून अनेक ठिकाणी असलेल्या कचराकुंड्या, रस्त्याच्या कडेला साचलेला कचरा, तसेच गटारी तुंबल्याने दिसून येत आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहणे ते साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने पुन्हा नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

रस्त्यांची झाली चाळण 
पंधरा- वीस दिवसापूर्वी सतत पाच-सहा दिवस पाऊस पडत असल्याने शहरातील मुख्य रस्ते. तसेच अनेक कॉलनी, वसाहती तसेच वाढीव वस्त्यांमधील कच्चे रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे नागरिकांना खराब रस्त्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढू लागले आहेत. 

मनपा कामाला सुरवात करणार कधी ? 
मनपाची निवडणूक शुक्रवारी संपल्याने शनिवारी महापालिकेत अनेक अधिकारी ते कर्मचारी सुट्टीवर होते. तर हजर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम संथ गतीने सुरू होते. परंतु शहरात अस्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील स्वच्छतेची सुविधा केव्हा मिळणार असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

Web Title: garbage issue in the jalgaon city again