शरद पवारांमधील हळवे आजोबा व्यक्त होतात तेव्हा...! चिमुकलीची 'ही' इच्छा केली पूर्ण..

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

शरद पवार आणि त्यांचे निवास्थान सिल्व्हर ओक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच! याचा अनुभव नुकताच झालेल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्राला आला. विरोधी पक्षांनी अनपेक्षितपणे मारलेल्या मुसंडीचे श्रेय अर्थातच राजकारणातील चाणक्य, ८० वर्षाचा तरुण.. अशा एक ना अनेक उपमा शरद पवारांना मिळाल्या. या 'तरुणाला' भेटण्यासाठी गैरराजकीय मंडळींना देखील भारी हौस असते. तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत भला मोठा चहाता वर्ग असलेल्या या यादीत जेव्हा अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश झाला...

नाशिक :  शरद पवार आणि त्यांचे निवास्थान सिल्व्हर ओक म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच! याचा अनुभव नुकताच झालेल्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्राला आला. विरोधी पक्षांनी अनपेक्षितपणे मारलेल्या मुसंडीचे श्रेय अर्थातच राजकारणातील चाणक्य, ८० वर्षाचा तरुण.. असे एक ना अनेक बिरुदे लागलेल्या शरद पवारांना गेले. या 'तरुणाला' भेटण्यासाठी गैरराजकीय मंडळींना देखील भारी हौस असते. तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत भला मोठा चहाता वर्ग असलेल्या या यादीत जेव्हा अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश झाला... तेव्हा चक्क सिल्व्हर ओक वरून तिला आमंत्रण मिळाले. अन गार्गी थेट पवारांना जाऊन भेटली. तेव्हा एरवी चाणक्य वैगरे म्हणवल्या जाणाऱ्या पवारांमधील हळवे आजोबा उपस्थितांच्या नजरेतून सुटू शकले नाही.

सोशल मीडियावर भारी भाव खाऊन गेली गार्गी... 
गार्गी ही प्रियंका व सागर आहेर या दांपत्याची मुलगी. एका निवडणूकित प्रचाराचे वारे वाहत असतांना असेच काही राष्ट्रवादीचे प्रचारक आहेर यांच्या घरी आले. कार्यकर्त्यांच्या हातातील झेंडा कुठलीही समज नसलेल्या गार्गीचे हातात घेतला अन शेताच्या बांधावर फडकवितांना तिचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. संपूर्ण राज्यात शरद पवारांची सर्वात चिमुरडी चहाती म्हणून गोंडस गार्गी सोशल मीडियावर भारी भाव खाऊन गेली. तिचा फोटो बघून पुण्यातील राष्ट्रवादीचे परिक्षित तलोकर यांनी चक्क चांदोरी ता. निफाड गाठत गार्गीला भेट दिली. यावेळी शरद पवारांना भेटायचं का म्हणून विचारलं असता इवल्याश्या गार्गीने लगेचच होकार दिला. अर्थात तिला पवारांच्या कर्तृत्वाची जाण नसेलही पण राज्याच्या राजकारणात सुरुवातीपासून केंद्रबिंदू असलेले शरद पवार गार्गीने अनेकदा घरातल्या टीव्हीवर बघितले अन चक्क बाबा, बाबा म्हणत भेटण्याचा आग्रह केला.

बालहट्ट सिल्व्हर ओक पर्यंत पोहचवला...
शरद पवारांची भेट म्हंटल की अनेकांच्या बकेट लिस्ट मधला हा प्राधान्यक्रम. अशात आपला नंबर कधी म्हणून गार्गीच्या वडिलांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु हट्ट सोडतील ती लेकरं कसली? यामुळेच जेव्हा जेव्हा शरद पवार तिला टीव्हीवर दिसत तेव्हा तेव्हा तिचा हट्ट आई-प्रियंका व वडील सागर यांना विचार करायला लावायचा. लेकीचा ह्या हट्टाची त्यांनी राष्ट्रवादी चे परीक्षित तलोकर यांना सागर आहेर यांनी माहिती दिली. त्यांनीही हा बालहट्ट सिल्व्हर ओक पर्यंत पोहचवला. यानंतर थेट पवारांच्या भेटीचे गार्गीला निमंत्रण मिळाले. लगेचच मुंबई गाठत तिने आपल्या आई-वडिलांसह पवारांना गुलाबपुष्प देत त्यांच्या विषयी प्रेम व्यक्त केले. एरवी राजकीय हेतूने भेटणाऱ्या कार्यकर्त्या व्यतिरिक्त पवारांना भेटणारी ही चिमुकली त्यांच्यासाठी देखील तितकी खास ठरली. अशात पवारांमधील आजोबांनी देखील मग तिची तितक्याच मायेनं चौकशी करून तिला भारताची एक सक्षम, जबाबदार, निर्भीड नारी होण्यासाठी आशीर्वाद दिलेत.

हेही वाचा > घरच्यांनी दूर केले...दुसऱ्यांनी जगायला शिकवले!

#TuesdayMotivation : सत्तर हजाराचे सोन्याचे मंगळसुत्र 'त्याने' केले परत..कोण होता तो?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gargi Aher meets Sharad Pawar at Silver oak Nashik Marathi News