मेहुणबारे भागात वीजपंप चोरणारी टोळी सक्रिय?

दीपक कच्छवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नुकतेच शेतातून तिघांनी जनरेटर लांबविल्याची घटना बहाळ (ता.चाळीसगाव) येथे घडली आहे. मेहुणबारे पोलिस ठाण्यात या तिघा भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुवार्डी (ता. भडगाव) येथील प्रदीप भालेराव पाटील यांचे बहाळ शिवारात शेती असून शेतातून सुमारे 45 हजार रूपये किमतीचे जनरेटर 14 एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते 20 एप्रिलच्या सकाळी दहाच्या दरम्यान चोरीस गेले.

यातील संशयित अमोल प्रदेशी (राहणार भडगाव) दयानंद पाटील, प्रविण पाटील, दोन्ही (राहणार जुवार्डी) यांनी जनरेटर लांबविल्यांची तक्रार प्रवीण पाटील यांनी मेहुणबारे पोलिस ठाण्यात दिल्यावरून तिघां संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हवालदार पृथ्वीराज कुमावत हे करीत आहेत.

पाच वीजपंप चोरीला
वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील परिसरातून तब्बल पाच वीजपंप  चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.यामध्ये ग्रामपंचायतीचाही एक  वीजपंप  आहे. वीजपंप चोरी होत असल्याने शेतकऱ्यामध्ये भीती पसरली आहे. परिसरात वीजपंप चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.विजपंप बरोबर दुचाकीमधील पेट्रोल चोरणे हे देखील नित्याचेच झाले आहे.या वाढत्या चोरीच्या घटना पाहुन या भागातील चोऱ्या रोखण्याचे  पोलिसां समोर आव्हान राहणार आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवुन चोरट्यांचा तपास लावावा आशी  मागणी होत आहे.

Web Title: Generators are being stolen frequently in Mehunbare