घरकुल गैरव्यवहार : सुरेश जैन, देवकरांचा निकाल 1 ऑगस्टला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

धुळे न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी धुळे न्यायालयात घेण्यात आली. न्यायाधीश सृष्टी निळंकठ यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू असून १५ जुलै निकाल जाहिर करण्यात येणार होता. धुळे येथील न्यायालयात आज सर्व संशयित आरोपी हजर होते. मात्र न्यायाधीशांनी निकाल १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला.

जळगाव : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील खटल्याचा निकाल आता 1 ऑगस्टला लागणार आहे. धुळे येथील न्यायालयात न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. 

जळगाव घरकुल गैरव्यवहार प्रकरणी तात्कालीन जळगाव महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तब्बल सहा वर्षानी तत्कालीन पोलीस उपअधिक्षक इश्‍यू सिंधू यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात येवून कारवाई करण्यात आली होती. यात माजी मंत्री आमदार सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह ४८ जण संशयित आरोपी आहेत. यातील तीन जण मयत आहेत. तर एक आरोपी फरार आहे. 

धुळे न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी धुळे न्यायालयात घेण्यात आली. न्यायाधीश सृष्टी निळंकठ यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू असून १५ जुलै निकाल जाहिर करण्यात येणार होता. धुळे येथील न्यायालयात आज सर्व संशयित आरोपी हजर होते. मात्र न्यायाधीशांनी निकाल १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gharkul scam verdict on 1st august in Jalgaon