गोटेंनी आता आराम करावा, 2 जागांबद्दल अभिनंदन: महाजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

धुळे :  "अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा," अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांना घरचा आहेर केला आहे. 

धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची पूर्ण बहुमताकडे घोडदौड सुरु असताना या निवडणूक मोहिमेचे भाजपचे सूत्रधार गिरीश महाजन प्रतिक्रिया देताना म्हणाले, "अनिल गोटे यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी आता जरा आराम करावा. अनिल गोटेंनी निवडणुकीच्या काळात व्हॉटसअॅप, फेसबूक आणि सोशल मीडियावरजी भाषा वापरली, ती योग्य नव्हती. त्यांची भाषा  ती धुळेकरांना मान्य नव्हती."

अनिल गोटेंना टोला लागवताना महाजन पुढे म्हणाले, "अनिल गोटे यांच्या भाषेवरूनच त्यांचा  पराभव स्पष्ट दिसत होता. अनिल गोटे यांच्या  २ जागा आल्या, त्या आल्या कशा? हा प्रश्न मला आहे.  अण्णांच्या २ जागा आल्या, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो."

"अनिल गोटे यांना निवडणुकी आधी आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी ताठर भूमिका घेतली. मी सांगेन तेच उमेदवार घ्या असा त्यांनी आग्रह धरला. त्यांचं ऐकून उमेदवार दिले असते तर भाजपच्या विजयी उमेदवारांची संख्या  दहावर सुद्धा गेली नसती. " असेही ते म्हणाले. 

Web Title: Girish Mahajan criticized Anil Gote