Vidhan Sabha 2019 : लाखाच्या फरकाने निवडून येणार; गिरीश महाजनांना विश्वास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

'काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात आवक आपल्याकडे झाली आहे. पवारसाहेबांचे उजवे-डावेही भाजपमध्ये आलेत. काँग्रेसमध्ये तर उजवे-डावे म्हणायला पण कोणी राहिले नाही,' असा टोला महाजन यांनी लगावला. 288 पैकी 40 जागाही आघाडीच्या निवडून येणार नाही असे भाष्य त्यांनी यावेळी केले.

भाजप जामनेर : 'एवढी संख्या बघून इतकंच कळतंय की आपण नक्की निवडून येणार, प्रश्न फक्त एवढाच आहे की किती मतांनी निवडून येऊ. गेल्या वेळी 42 हजारांनी निवडून आलो होतो यावेळी एक लाखांच्या मतांनी निवडून यायला हवाय. ज्या संख्येने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे सहज मोठ्या मताधिक्याने आपण निवडून येणार अशी मला खात्री आहे,' असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. 

VidhanSabha 2019 : नागरिकांचा कौल भाजपला;विजय निश्चित : जगदीश मुळीक

जामनेर विधानसभा मतदारसंघातून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरत शक्तिप्रदर्शन केले. यादरम्यान ते बोलत होते. 'काँग्रेस-राष्ट्रवादीची मोठ्या प्रमाणात आवक आपल्याकडे झाली आहे. पवारसाहेबांचे उजवे-डावेही भाजपमध्ये आलेत. काँग्रेसमध्ये तर उजवे-डावे म्हणायला पण कोणी राहिले नाही,' असा टोला महाजन यांनी लगावला. 288 पैकी 40 जागाही आघाडीच्या निवडून येणार नाही असे भाष्य त्यांनी यावेळी केले. 

गिरीश महाजनांच्या विरोधात आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळेल हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तालुक्यातील सर्व समाज आज माझ्या पाठीशी आहे. एक औपचारिकता म्हणून मी फॉर्म भरतोय. असंही महाजन यांनी यावेळी सांगितले. 

Vidhan Sabha 2019 : खडकवासल्यात कांटे की टक्कर!

पुण्यातही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भरला फॉर्म 

पुणे : पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अनेक चर्चा, वाद आणि विरोधानंतर चंद्रकांत पाटलांना ही उमेदवारी मिळाली. कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी याही अर्ज भरण्यासाठी उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Mahajan filed nomination from Jamner assembly constituency from BJP