चिंता नसावी...सत्ता आपलीच.. 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 20 November 2019

कोकण सहल आटोपून गोव्यात सोमवारी (ता. 18) सायंकाळी भाजप नगरसेवक पोचले. मंगळवारी (ता. 19) दिवसभरात आणखी काही नगरसेवक दाखल झाल्याने नगरसेवकांची संख्या पन्नासपर्यंत पोचली. दुपारी महाजन गोव्यात पोचले. बागा बिचसमोरील नाजीर रिसोर्टमध्ये सायंकाळी नगरसेवकांना संबोधित केले. बहुमत असूनही नाशिकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. माजी आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी त्यांच्याबरोबर जाणे पसंत केल्याची कबुली त्यांनी दिली. परंतु महापालिकेत सत्ता भाजपचीच येणार असल्याने चिंता करू नका, असा सल्ला देताना महापौर लादला जाणार नसल्याचा शब्द दिला.

नाशिक : राज्यात भाजपची सत्ता असलेल्या इतर महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये परिस्थिती बिकट आहे. परंतु ही परिस्थिती का निर्माण झाली याची कारणेही तुम्हाला माहीत आहे. परंतु चिंता करू नका, सत्ता आपलीच येणार आहे, असा दिलासा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गोवा येथे भाजप नगरसेवकांच्या कॅम्पामध्ये बोलताना दिला. राज्यातील इतर महापालिकांमध्ये भाजपच्या सत्तेची सर्व गणिते जमली आहेत. नाशिकमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे लक्ष नाशिककडे लागल्याची कबुली त्यांनी दिली. 

राज्याचे लक्ष नाशिककडे असल्याची कबुली 

कोकण सहल आटोपून गोव्यात सोमवारी (ता.18) सायंकाळी भाजप नगरसेवक पोचले. मंगळवारी (ता.19) दिवसभरात आणखी काही नगरसेवक दाखल झाल्याने नगरसेवकांची संख्या पन्नासपर्यंत पोचली. दुपारी महाजन गोव्यात पोचले. बागा बिचसमोरील नाजीर रिसोर्टमध्ये सायंकाळी नगरसेवकांना संबोधित केले. बहुमत असूनही नाशिकमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. माजी आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी त्यांच्याबरोबर जाणे पसंत केल्याची कबुली त्यांनी दिली. परंतु महापालिकेत सत्ता भाजपचीच येणार असल्याने चिंता करू नका, असा सल्ला देताना महापौर लादला जाणार नसल्याचा शब्द दिला. सर्व नगरसेवकांना विश्‍वासात घेऊनच महापौरपदासाठी निवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नीतेश राणे, आमदार सीमा हिरे उपस्थित होते. 

Image may contain: 1 person, crowd

Photo : गोवा येथे भाजपच्या बैठकी प्रसंगी उपस्थित नगरसेवक

"पदांपासून वंचित असणाऱ्यांना न्याय द्या' 
आतापर्यंत एकाही नगरसेवकाला कुठलेच पद मिळाले नाही. त्याला महापौर, उपमहापौरपदाची उमेदवारी देण्याची मागणी या वेळी नगरसेवकांच्या "वन टू वन' बैठकीत करण्यात आली. पुढील सव्वादोन वर्षांत विकासकामे करण्याबरोबरच विरोधकांना सक्षमपणे तोंड देणे व पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी नेतृत्वाची गरज असल्याचे मत बहुतांश नगरसेवकांनी व्यक्त केले. 

अद्यापही आठ नगरसेवक गायब 
भाजपच्या 65 नगरसेवकांपैकी अद्यापही आठ नगरसेवक संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. खरोखर या नगरसेवकांनी विरोधात मतदान केल्यास नियोजित महाशिवआघाडीचे पारडे जड होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मनसेच्या भूमिकेवर सर्व अवलंबून असल्याने मनसे किंगमेकरच्या भूमिकेत दिसत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Mahajan gives relief to corporators Nashik News