गिरीश महाजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकसह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

जळगाव : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकसह जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांना पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्याचे सहसचिव माधव गोडबोले यांनी सदरचा अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्रीपद कायम ठेवून जळगाव जिल्ह्याचे देखील पालकमंत्री पद देण्यात आले आहे. जळगावचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रीपद कायम ठेवून पुण्याचे पालकमंत्री पद सोपविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Mahajan is guardian minister of Jalgaon