विरोधकांकडे आता मुद्दे उरले नाही - महाजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नाशिक - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक उड्या मारत होते. राज्य सरकारने हे आरक्षण दिले असल्याने विरोधकांकडे मुद्दे उरले नाहीत, असा टोला पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मारला. नांदुरी येथील महाआरोग्य शिबिराच्या उद्‌घाटनाच्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळात मदत होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे याकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, की सरकारने आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली आहे.

निसर्गाच्या कोपामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पाणी, चारा आणि रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सरकारतर्फे सुरू आहे.

Web Title: Girish Mahajan Talking Politics