मुलीचे दागिने काढून घेऊन ब्लॅकमेलिंग

Crime
Crime

जळगाव - शहरातील रामानंदनगरात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असलेल्या एका भामट्याने घरासमोरच राहणाऱ्या चौदावर्षीय कोमल पाटील (काल्पनिक नाव) हीस आईच्या आजारपणाचे कारण देत तिचे दागिने काढून घेतले. ठरल्याप्रमाणे बराच काळ उलटूनही दागिने स्वत:हून दिले नाहीत म्हणून मुलीने तगादा लावल्यावर तिच्या आई व लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत आणखी पैशांची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले.

घडलेला प्रकार पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर त्याला फोन लावण्यात आला. या भामट्याने थेट ‘तुमच्याकडून जे होईल ते करा’ असे आव्हानच पोलिसांना दिल्यानंतर प्रकरणाची सत्यता पडताळून गुन्हा नोंदविण्यात आला. 
वडिलांचे निधन झालेले, आई सरकारी नोकर, कुटुंबात लहान भाऊ आणि कोमल असे सदस्य, आई कामावर गेल्यानंतर समोरच राहणाऱ्या सपकाळे काकूंना सांगून जाणार. दोन्ही कुटुंबीयांचे एकमेकांशी घरोब्याचे संबंध अशात श्रीमती सपकाळे आजारी पडल्याचे कारण देत त्यांचा मुलगा अतुलने कोमलकडून तिच्या कानातील टॉप्स देण्याची विनवणी केली. टॉप्स गहाण ठेवून अतुलने पैसे मिळवून दारूत उडवून दिले. नंतर तो पुणे येथे खासगी नोकरीला असल्याने निघून गेला. महिना उलटूनही आपल्या कानातले करून देत नाही. आईने विचारले तर काय सांगणार म्हणून कोमल तणावात होती.

तिने अतुलला फोन लावून टॉप्सची मागणी केल्यावर घडले भलतेच. अतुलने तिला चक्क ‘तुझी आई हायवेने ये-जा करते, ट्रकवाल्यांना सांगून तिला चिरडून टाकीन आणि तुझ्या भावालाही गायब करेल’ असे सांगत ‘आणखी सतरा हजार रुपये आणून दे’ अशी धमकी दिली. हा सर्व प्रकार अतुलच्या आईच्या साक्षीने घडत होता. म्हणून कोमलच्या आईने तिला विचारणा केल्यावर दोन्ही कुटुंबांत भांडण होऊन प्रकरण तालुका पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिस ठाण्यातून संबंधित तरुणाला फोन लावला. मात्र, तिकडून या भामट्याने गुन्हाच कबूल केला नाही, तर चक्क पोलिस माझे काहीच करू शकत नाही. जे होईल ते करून घ्या, असा दम भरला. घडल्या प्रकारात रात्री उशिरा तालुका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com