निफाड - लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीचा वडिलांसमक्ष खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

निफाड - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीचा घरात घुसून तिच्या वडिलांसमोर कोयत्याने वार करून खून केला. कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे मंगळवारी (ता. ३१) सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर संबंधित तरुण स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला. दरम्यान, आपल्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेले वडील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.

निफाड - लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीचा घरात घुसून तिच्या वडिलांसमोर कोयत्याने वार करून खून केला. कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे मंगळवारी (ता. ३१) सकाळी अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर संबंधित तरुण स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला. दरम्यान, आपल्या मुलीला वाचविण्यासाठी गेलेले वडील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.

कसबे सुकेणे येथील सूरज दिगंबर चव्हाण (वय २८) व विद्या चंद्रकांत डेंगळे (२१) हे दोघेही महिंद्र कंपनीत कामाला होते. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. विद्या ही नाशिक येथे कंपनीत, तर काही दिवसांपासून सूरज हा निफाड येथील महिंद्र ट्रॅक्‍टर शोरुममध्ये कामाला होता.

दरम्यान, गेल्या २३ जुलैला दोघांचे पुन्हा भांडण झाले. मंगळवारी (ता. ३१) विद्या घरी असल्याने सूरज तिच्या घरी आला. त्या वेळी विद्याचे वडीलही घराबाहेर होते. दोन्ही कुटुंबीय एकाच जातीचे असल्याने त्यांच्यात घरी येणे-जाणे आहे. त्यामुळे विद्याच्या वडिलांनी तिकडे लक्ष दिले नाही. मात्र, काही वेळातच घरातून दोघांचा भांडणाचा आवाज आला. तेव्हा तिचे वडील घरात गेले असता, सूरज हा विद्यावर कोयत्याने सपासप वार करत होता. त्यामुळे त्यांनी विद्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता, सूरजने त्यांच्यावरही वार केले. या हल्ल्यात विद्याचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले. विद्याची आई अंगणवाडीसेविका असून, त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संजय दराडे, सहाय्यक अधीक्षक गायकवाड, उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी दिली होती समज
दोन वर्षांपूर्वीच सूरज व विद्या यांना विवाह करायचा होता; परंतु तो काही कारणाने लांबला. त्यानंतर काही दिवसांत दोघांमध्ये खटके उडाले. या वेळी विद्याने ओझर पोलिस अंकित सुकेणे आउटपोस्ट येथे सूरज त्रास देत असल्याची तक्रारही दाखल केली होती. यावरून पोलिसांनी दोघांनाही सुकेणे येथील चौकीत बोलावून सूरजला समज दिली होती. त्या वेळी ‘आपण यापुढे त्रास देणार नाही’, असे त्याने सांगितले होते. 

Web Title: girl murder crime