पुष्पक एक्‍स्प्रेसमध्ये तरुणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12533 अप लखनौ-मुंबई पुष्पक एक्‍स्प्रेसमधील एस-6 कोचवरुन नवी मुंबईची एक तरुण प्रवास करीत होती.

भुसावळ - 12533 अप पुष्पक एक्‍स्प्रेसमध्ये बर्थवर झोपलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिकच्या सैनिकाविरुद्ध येथील लोहमार्ग पोलिसात आज गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना काल (ता. 7) गाडीने मनमाड स्थानक सोडल्यानंतर घडली. संशयित सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12533 अप लखनौ-मुंबई पुष्पक एक्‍स्प्रेसमधील एस-6 कोचवरुन नवी मुंबईची एक तरुण प्रवास करीत होती. ही तरुणी झोपेत असताना संशयित सैनिक मदनमोहनसिंग ग्यानसिंग बहाद्दुरसिंग (वय 35, रा. मालवाडी, नाशिक) याने विनयभंग केला. याबाबत तरुणीने रेल्वे पोलिसात तक्रार दिली असून, संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: girl physical harassed in bhusawal