पाच वर्षीय बालिकेचा बलात्कार करून खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

घोटी/वैतरणानगर (जि. नाशिक) - पाच वर्षे वयाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार व खून करून, मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिल्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार आज आवळी (ता. इगतपुरी) येथे उघडकीस आला. गेल्या तेरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या बालिकेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित तरुणानेच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

वैतरणा परिसरातील आवळी दुमाला येथील किरण रमेश जमधडे (वय 5) ही बालिका गेल्या 31 मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास अंगणात खेळत असताना बेपत्ता झाली होती. तिचे वडील रमेश जमधडे यांनी गावातच राहणारा व त्यांच्या नात्यातील असलेला गोपीनाथ दत्तू जमधडे (वय 22) याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला चार दिवसांपूर्वी कसारा येथील हॉटेल ओम साईमधून ताब्यात घेतले होते. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार आज संबंधित जागेवर मृतदेह शोधण्यात आला. तेरा दिवसांपूर्वी त्याने गावाजवळील नाल्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र किरणने विरोध करत, आरडाओरडा केल्याने गोपीनाथने तिच्या डोक्‍यात दगड घातला व गळा आवळून, ठार मारून त्याच ठिकाणी मृतदेह पुरून टाकला.

Web Title: girl rape and murder crime