कर्जवसुलीच्या त्रासाने युवतीने केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

शिरपूर - भावावर झालेले कर्ज वसूल करण्यासाठी सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून उच्चशिक्षित युवतीने काल रात्री सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. आज सकाळी तिचा मृतदेह हाती लागला. तिने लिहून ठेवलेल्या पत्रातून आत्महत्येमागील कारणाचा उलगडा झाला. 

शिरपूर - भावावर झालेले कर्ज वसूल करण्यासाठी सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून उच्चशिक्षित युवतीने काल रात्री सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. आज सकाळी तिचा मृतदेह हाती लागला. तिने लिहून ठेवलेल्या पत्रातून आत्महत्येमागील कारणाचा उलगडा झाला. 

यास्मीन शब्बीर मणियार (२२, रा.वाघाडी) असे युवतीचे नाव आहे. काल रात्री ती सावळदे येथे पोहचली, सोबत आणलेल्या बॅगमध्ये तिने पत्र, मोबाईल व अन्य कागदपत्रे काढून ठेवली. बॅग पुलावर ठेवून तिने नदीत उडी घेतली. तेथील ग्रामस्थांना बॅग आढळली. त्यातील कागदपत्रांवरून त्यांनी वाघाडी गावात संपर्क केला. तिचा शोध घेत असलेले नातलग घटनास्थळी पोहोचले. आज पहाटेपासून परिसरातील मच्छीमारांच्या सहकार्याने तिचा शोध सुरू होता. सकाळी दहाला तिचा मृतदेह हाती लागला. तिचे मामा हारुण रमजान मणियार यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. 

यास्मीनचे एम.ए.पर्यंत शिक्षण झाले होते, त्यानंतर तिने नर्सिंगचा कोर्स केला होता. तिला दोन भाऊ व बहीण आहे. तिचे वडील १४ वर्षांपूर्वी वारले. १२ वर्षांपूर्वी आईचेही निधन झाले. आजी-आजोबांकडे हे सर्वजण राहत होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

काय लिहिले होते चिठ्ठीत
आत्महत्या करण्यापूर्वी यास्मीनने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटल्यानुसार, तिच्या भावाने काही लोकांकडून पैसे उसनवारी घेतले होते. त्याच्या वसुलीसाठी तिच्या भावाला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे घरातील सर्वजण तणावाखाली होते. उच्च शिक्षण घेतल्यावरही नोकरी मिळत नसल्याने नैराश्‍य आले आहे. माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नाही. भावाला टॉर्चर करू नये. त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांमुळे हे पाऊल उचलावे लागत आहे. आजी-आजोबांनी आतापर्यंत सांभाळल्याबद्दल धन्यवाद. नानी मला माफ कर. यास्मीनच्या भावाला अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज देऊन त्याची वसुली करण्यासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा छडा लावून अटक करावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: girl suicide by loan recovery Troubles