आईशी भांडण झाल्याने 'त्या' युवतीची आत्महत्या

Gayana-Khairnar
Gayana-Khairnar

जळगाव - शहरातील बजरंग बोगद्याजवळ रेल्वेखाली आल्याने सतरावर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २८) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली होती. गायना सुनील खैरनार (वय १७, रा. त्रिमूर्ती कॉलनी, पिंप्राळा) असे मृत युवतीचे नाव असून, आईशी भांडण झाल्याने तिने रागाच्या भरात घर सोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

बजरंग बोगद्याजवळ अप रेल्वेलाइन खांबा क्रमांक ४१८/८-१० या याठिकाणी रेल्वेखाली झोकून दिल्याने काल अनोळखी युवतीचा मृतदेह आढळून आला होता. रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात ठेवला होता. मृत युवतीची आज ओळख पटली असून, गायना सुनील खैरनार (वय १७) या युवतीने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे आज स्पष्ट झाले.

पिंप्राळा येथील त्रिमूर्ती कॉलनीत खैरनार कुटुंबीय वास्तव्यास असून, मृत गायनाचे वडील सुनील खैरनार पनवेल येथे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. कुटुंबात आई, लहान भाऊ पार्थ (१५ वर्ष) असा परिवार आहे. गायना शहरातील नंदिनीबाई महिला महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत असून, घरात आईसोबत किरकोळ वाद झाल्याने गायना पहाटे साडेसहाच्या सुमारास कुणालाही काहीएक न सांगता निघून गेली होती. दिवसभर घरी नसल्याने ती रागात मैत्रिणीकडे गेली असेल, येईल घरी म्हणून सायंकाळपर्यंत आई घरीच होती. मात्र, साडेसात वाजूनही मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, गायना कुठेच आढळून आली नाही. 

बातमी वाचून रुग्णालयात धाव
सकाळी वृत्तपत्रात अनोळखी मुलीच्या मृत्यूची बातमी वाचल्यावर आईसह कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मृतदेह बघितल्यावर आई-वडिलांनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com