गोड बातमी - गर्भातील कळ्या खुलल्या

दीपक आहिरे
मंगळवार, 26 जून 2018

पिंपळगाव बसवंत - वंशाचा दिवा हवा या हट्टापायी कोवळ्या कळ्या उमलण्यापूर्वीच गर्भातच खुडल्या जात होत्या. त्यातून मुलींचे घटते प्रमाण समाजात चिंतेचा विषय ठरत होता. विविध पातळ्यांवर कारवाईसोबतच जनजागृती होऊन कन्यारत्नाचे स्वागत आता होऊ लागले आहे. 

लिंग गुणोत्तराच्या आकडेवारीनुसार नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्‍यात स्त्री व पुरुष यांच्यातील आकडेवारीत अत्यल्प फरक असून, सिन्नर तालुक्‍यात ही तफावत सर्वाधिक आहे.

गर्भाची तपासणी करून सर्रास मुलीचा श्‍वास जन्मापूर्वी रोखला जात होता. त्यातून मुला-मुलींच्या प्रमाणात मोठी तफावत झाली. हजार मुलांच्या जन्माच्या तुलनेत ९०० मुलींच्या जन्माचे प्रमाण नाशिक जिल्ह्यात होते. यंत्रणेने सामाजिक संस्थांना हाताशी घेत ‘बेटी बचाओ’ची हाक दिली. तसेच शासकीय यंत्रणेने अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या. नकोशी वाटणारी मुलगी आता समाजात हवीहवीशी वाटू लागली आहे.

नव्या पिढीची मानसिकता बदलत असून, मुलीचा आनंदाने स्वीकार केला जात आहे. विविध पातळ्यांवर झालेल्या जनजागृतीचे हे फलित आहे. स्त्रीभ्रूणहत्येविरोधात उचललेली कठोर पावले स्त्री जन्मदर वाढण्यास निर्णायक ठरले आहे. समाजाच्या प्रतिसादाने प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत आहे.
- डॉ. योगेश धनवटे, वैद्यकीय अधिकारी, पिंपळगाव बसवंत

मुला-मुलींमधील फरक ही मानसिकता समाजातून हद्दपार व्हायला हवी. मुलाचा हट्ट न धरता दोन मुलींवर थांबण्याचा निर्णय मी व पतीने घेतला. मुलींना मुलाप्रमाणेच वाढविले. स्त्रीजन्माच्या स्वागताची संकल्पना प्राथमिक आरोग्य केंद्रात शासन निर्णयापूर्वी राबविली. जिल्ह्यात कोवळ्या कळ्या उमलू लागल्या आहेत, हे सुखावणारे चित्र आहे.
- वैशाली बनकर, माजी सभापती, पंचायत समिती, निफाड

Web Title: Girls birth rate increase